उस्मानाबादेत आजपासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू.
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि 7 मे. 2021
दिवसेंदिवस वाढते कोरोणा रुग्ण आणी मृत्यूचे प्रमाण यावर नियंत्रणासाठी आता जनता कर्फ्यूचा अंतिम निर्णय
घेण्यात आला असून आज दि .8 मे पासून 13 मे च्या सकाळपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी आज आदेश जारी केले . उस्मानाबादेतील वाढता मृत्यूदर हा राज्यासाठी चिंतेची बाब ठरत असताना उस्मानाबादेतील संपूर्ण आरोग्य व्यवस्था वाढत्या संक्रमणामुळे कोलमडल्याप्रमाणे झाली आहे.
अशातच आज आमदार कैलास पाटील यांच्यासह विविध संघटनांकडून जनता कर्फ्यू तसेच
कडक निर्बंध लादण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.