जागेच्या वादातून काकाने केली पुतण्याची हत्या सात आरोपी ना अटक रामपूर येथील घटना
आंधळगाव : जवळील (मांडेसर) रामपूर येथील एकाच परिवारातील शेतीच्या हिस्से वाटणी वरून झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना ता 7 ला सकाळी 8:30 वाजे दरम्यान मोहाडी तालुक्यातील रामपूर शिवारात घडली असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मांडेसर येथील सव्वालाखे कुटुंबाच्या शेतीचे काही दिवसांपूर्वी पोट हिस्से करण्यात आले. परंतु झालेल्या जागेच्या वाटणीवरून कुटुंबातील काही सदस्य असमाधानी होते, यातच जागेला घेऊन त्यांच्यात वाद होता. आज सकाळी ८.३० वाजता रवींद्र शामराव सव्वालाखे (३८) हा रामपूर येथील आपल्या शेतावर गेला असता आरोपी सोबत त्याचा वाद झाला. नात्यात काका, काके भाऊ असलेल्या आरोपींनी हल्ला चढवून रवींद्रच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला, त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला. भांडणाची आवाज ऐकून मृतकाचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला, परंतु आरोपी हातात लाठ्या काठ्या, लहान तलवार घेऊन त्यालाही मारायला धावले, तो साधारण जखमी झाला, परंतु तो आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाला. देवेंद्र शामराव सव्वालाखे (३०) याच्या फिर्यादीवरून मोहाडी पोलिसांनी कलम ३०२,३२४,१४७,१४८,१४९, भादवी, म.पो.का. १३५, भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे (५५), बाबूलाल उपासू सव्वालाखे(५३) गेंदालाल जलकन सव्वालाखे(३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे(२३), बळीराम बाबूलाल सव्वालाखे(२१), विनोद जलकन सव्वालाखे(३५) रा सर्व रामपूर(मांडेसर) अश्या सात आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार राहुल देशपांडे, एपीआय राजेंद्र गायकवाड, पोह. सोमेश्वर सेलोकर, पोना.मिथुन चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे हे करीत आहेत.