BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सवाल : परदेशी मदत कुठे गेली ?

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ७ मे २०२१ देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागितली होती. ती मदत कुठे […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ७ मे २०२१
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागितली होती. ती मदत कुठे गेली, ? असा प्रश्न रोखठोकपणे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. तसेच काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
भारताला आतापर्यंत किती परदेशी मदत मिळाली? मिळालेल्या सेवा कोठे आहेत? परदेशातून मिळालेल्या मेडिकल साहित्यांचा फायदा कोण घेत आहेत ? साहित्यांची राज्य निहाय विभागणी केली ?? आणि ती कश्याप्रकारे करण्यात आली? जर हे केले असेल तर यात पारर्शकता का दिसून येत नाही? याचे मोदी सरकारकडे उत्तर आहे का? कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदी सरकारकडे रणनीतीचा अभाव आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *