महाराष्ट्र हेडलाइन

चिरकुट लीडर्स कोणत्या बिळात शिरले?? वारंवार अनावश्यक पातळीच्या ब्राॅंडकाॅस्टची गरज.?? प्रा. एम. आनंद यांनी व्यक्त केले मत.

Summary

मुंबई.:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि .2.मे 2021 कोरोना च्या काळात जनता मरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोरोना ही महामारी असल्याचेही जाहीर केले आहे. या महामारी च्या काळात डॉक्टर, परिचारिका, नसऀ , पोलीस, पत्रकार , स्वयंसेवी संस्था यांनीही मोलाची […]

मुंबई.:- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि .2.मे 2021
कोरोना च्या काळात जनता मरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोरोना ही महामारी असल्याचेही जाहीर केले आहे. या महामारी च्या काळात डॉक्टर, परिचारिका, नसऀ , पोलीस, पत्रकार , स्वयंसेवी संस्था यांनीही मोलाची कामगिरी केली आहे. तरीही देशाच्या कानाकोपऱ्यातून कोरोना च्या रुग्णांना वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावून , आपले प्राण धोकादायक वातावरणात झोकून देऊन काम करीत आहेत.. त्यात अनेक कोरोना योध्दांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरीही आपल्या देशातील अनेक प्रसार माध्यमांनी खूप खालच्या पातळीवरची ब्राँडकास्टींग केली आहे. ही फक्त आपल्याच देशातच होवु शकते.? इतकी इतर देशात होतांना दिसून येत नाही. कोरोना च्या काळात
धडधडत्या चिता…पेशंटने भरलेले हाँस्पीटल्स्…स्मशानभुमीत मृतकांची लाईन…अस्वस्थ नातेवाईक…हाॅस्पिटल बाहेर हंबरडा फोडणारे लोक… हे सगळं दाखवुन काय सिद्ध करायचे आहे आपल्याला…?? महामारी आहे.
सगळ्यांना माहीत आहे.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे…
हे पण सगळ्यांना माहीत आहे..
परंतु हे न दाखवता काही महत्त्वाच्या बातम्या , दाखवायला पाहिजे . त्यामुळे वैचारिकता सकारात्मक होऊन नातेवाईक आणि रुग्ण ही बरे व्हायला पाहिजे. चांगले झालेल्या पेशंटचे इंटरव्ह्यु दाखवा…आँक्सिजन सिलिंडर कुठे मिळतात ते दाखवा…कुठल्या हाँस्पीटलमध्ये बेड उपलब्ध आहेत ते प्रसिद्ध झाले पाहिजे. रेमडिसीव्हर इंजेक्शण कुठे मिळेल हे प्रसार माध्यमांनी दाखवायला पाहिजे…..प्लाज्मा डोनर किती व कुठे आहेत त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहचवली पाहिजे असे वृत्त प्रसार माध्यमांनी दाखविण्याची नितांत गरज आहे.
अँम्बुलन्स सेवा कुठे कुठे उपलब्ध आहेत याबाबत माहिती प्रसिद्ध झाली तर, जनता त्याचा आवश्यकतेनुसार लाभ घेऊ शकते हे प्रसारमाध्यमांनी दाखविण्यात आले पाहिजे.
हाॅस्पीटलची जास्त आलेली बिले कशी कमी करावीत याची माहिती दाखवा.. काही जनहिताच्या योजना असल्याचे,
लसीकरणाबाबत जनजागृती करून माहिती दिली पाहिजे.
रोज कोरोनामुक्त होणाऱ्या पेशंटची आकडेवारी दाखविण्या बरोबरच उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी प्रसिद्ध झाली तर खुप काही चांगले, सकारात्मक परिणाम घडतील. असे मत प्रा. एम. आनंद यांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक टिव्ही चॅनेलनी फक्त “ब्रेकींग न्युज” “धक्कादायक बातमी” व सनसनी निर्माण करणाऱ्या बातम्या दाखवुन सर्वसामान्य जनतेच्या मनात भीती पसरवुन काय सिद्ध करणार आहात? . तसेच एरवी बैनर लाऊन स्वत: ला जनतेसमोर सिध्द करणारे चिरकुट लिडर कुण्या बिळात शिरून बसले आहेत ? ते हुडकुन त्यांना जनसेवा करायला सांगा! . तरच देशात सुधारणा घडून येण्यास मदत होईल.. कोरोना च्या काळात प्रामाणिक प्रयत्न करून सेवा देत असलेल्या डॉक्टसऀ, नसऀ, पोलीस, आणि महत्वाची भूमिका, कामगिरी बजावली अशा व्यक्तींना पोलीस योध्दा न्युज नेटवर्क च्या वतीने आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *