BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सिद्धार्थ हत्तीअंबिरे सारखी दानाची वृत्ती जोपासली पाहिजे.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 30 एप्रिल 2021 आॅक्सिजनला प्राणवायू म्हटलं जातं. त्याचं दान म्हणजे साक्षात नवसंजीवनीचं दान ! समाजात अनेक दानशूर आहेत; पण दान कुठं नि काय द्यावं याची जाण असलेला असलेली माणसं तथागत गौतम बुद्धाच्या भवतु सब्बं […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 30 एप्रिल 2021
आॅक्सिजनला प्राणवायू म्हटलं जातं. त्याचं दान म्हणजे साक्षात नवसंजीवनीचं दान ! समाजात अनेक दानशूर आहेत; पण दान कुठं नि काय द्यावं याची जाण असलेला असलेली माणसं तथागत गौतम बुद्धाच्या भवतु सब्बं मंगलम् या विश्वकल्याणकारी वचनाला चारचांद लावत असतात.
आज घडीला ‘आॅक्सिजन’ हा शब्द परवलीचा शब्द बनला असून कोरोनाच्या सावटात तो भल्याभल्यांच्या स्वप्नातही येत असेल. अशावेळी वास्तवाचे भान ठेऊन मितभाषी कृतिशील युवा नेते *सिद्धार्थ हत्तीअंबिरे* पुढे आले असून आज त्यांनी परभणीतील कोविड रुग्णालयाला 50 ऑक्सिजन सिलेंडर दान करून दानपारमिता ही मंगल संकल्पना आपल्या मानवीय कृतीने सजविली .
समस्त सहपथिकांच्या उपस्थितीत झालेला हा भावपूर्ण कार्यक्रमाच शब्दातीतच !
सिद्धार्थजी, अभिमान वाटतो आपला !करावं तेवढं अभिनंदन कमी…!! आपण निरंतर धम्माच्या वाटेवरून चालत आला आहात; पण आजचा क्षण चिरकाल स्मरणात राहील. कारण त्याचं नातं थेट जीवनमरणाशी आहे !
आणि जगात जीवनापेक्षा अनमोल काहीच नाही !!
धन्य ते संविधानकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जे यथामति, यथाकुवत वेळ, बुद्धी, पैसा देतात !
विशेष म्हणजे सिद्धार्थजींच्या वाटचालीत अत्यंत मोलाचा वाटा असलेल्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांचे वडील गायकवाड साहेबांनी जगाचा कायमचा निरोप घेतल्याने सिद्धार्थजींवर अचानक डोंगर कोसळला असताना त्यांनी भावनांना बाजूला ठेवून नियोजित कार्यक्रमात सहभाग नोंदवत मानवीय कर्तव्याला सर्वोच्च मानलं ! सैल्युटच !!
*भवतु सब्बं मंगलम् !*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *