BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

साधे विवाह समारंभ काळाची गरज..उच्च पदस्थ अधिकारी आणि जन प्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.

Summary

(विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम – भामरागडच्या जंगलातून) दि. 29 एप्रिल 2021 समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने ही बाब आता प्रकर्षाने लक्षात आली आहे. विनाकारण लाखो रूपयांची […]

(विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम – भामरागडच्या जंगलातून) दि. 29 एप्रिल 2021
समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने ही बाब आता प्रकर्षाने लक्षात आली आहे. विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहेत. आतातरी वैचारिकता बदलले पाहिजे. नाही तर काळ कुणाला माफ करणार नाही. शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. शेती मालाला भाव नाही.
नोकऱ्या सरकारी राहिल्या नाहीत. खाजगी नोकरीत शाश्वती नाही. मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो. कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. विवाह हा सोहळा नाही तर तो ‘ संस्कार ‘ आहे .१६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे. कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. कित्येक लोक शेती विकून गुंठ्यावर आले. तर व्यापारी एका दुकानाचे चार दुकाने करतात . व्यापारी वर्गाला नाव ठेवण्यापेक्षा त्यांचे अर्थशास्त्र समजून घेतले पाहिजे. इर्षा नको तर सुदृढ स्पर्धा असली पाहिजे. भाऊ बंदकीतील जीवघेणी स्पर्धा कुठंच नको. विवाह प्रसंगी तर नकोच नको. वर-वधू यांना नेहमीच उपयोगी पडणारा पोशाख घेतला पाहिजे. वरमाईने सुध्दा रुसवे फुगवे करू नयेत. आपल्यालाही मुलगी आहे. सून उद्याची आपली काळजी घेणारी आपलीच मुलगी आहे. ही भावना रुजली पाहिजे. जेवणावळी, मानपान वरील खर्च कमी करून वधू वरांच्या भावी प्रगतीला हातभार लावावा. संसारात कधीच उपयोगी न पडणारी भांडी / फर्नीचर तर नकोच. मेहंदी, वैदिक पध्दत, हळदीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी टाळावी.स्वागत समारंभात साधेपणा आणावा. क्रिकेट ५ दिवसाचा, वन-डे वरुन २० – २० वर आला.तर आपण विवाह छोटेखानी / आटोपशीर करायला काय हरकत आहे ? मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो. कोरोनामुळे सर्व व्यावसायिकांनी त्यांचे भाव वाढवले आहेत.आपण मात्र बदल स्वीकारायला तयार नाही. आजची बचत उद्याची निर्मितीआहे बचतीला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही जातीधर्मांतील चांगल्या गोष्टींचा स्विकार केलाच पाहिजे . समाजातील उच्चपदस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे .(वकील,डाॅक्टर, प्राध्यापक , इंजिनियर सरकारी अधिकारी इ.) विवाह समारंभाबाबतीत काळाची गरज म्हणून आपण सर्वांनीच सुधारक होण्याची गरज आहे.त्यामध्ये आपल्या पुढील पिढ्यांचे उज्वल भविष्य दडले आहे. उच्चशिक्षित आणि सामान्य लोक यांच्यामधील दरी वाढत चालली आहे; समाजातील लोक आपणांस आपले आदर्श मानतात. अशा वेळी सामाजिक सुधारणांचे नेतृत्व उच्च शिक्षितांनी केले पाहिजे.समाजाचे प्रबोधन करायला पाहिजे . कोणते तरी सरकार कायदा करेल आणि मग बदल होतील हा पोकळ आशावाद आहे. कायद्याबरोबर प्रबोधन आणि जनजागृती करावी लागेल. यासाठी समाजातील उच्चमध्यम व मध्यमवर्गिय यांना महत्त्वाची जबाबदारी पारपाडावी लागेल. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती एक संधी समजून समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *