लॉकडाउन मुळे कर्ज फेड कसे करायचे. याचा गोरगरीब लोकांवर परिणाम?
चन्द्रपुर:- कोरोना या विशानूच्या प्रादुर्भाव लक्षात घेता. कलेक्टर यांनी लॉकडाउन घोषित केला आहे. अवघ्या काही दिवसांपासून लॉकडाउन चालू आहे. याचा परिणाम गोरगरीब लोकांवर होत आहे. अशा काही गोरगरीब लोकांनी प्राइवेट संस्थे तर्फे लोन घेतले आहे. त्या कर्ज़ाची परतफेड हप्तेवारी असल्याने आणि असे काही प्राइवेट फाईनांस लोन असल्याने अश्या काही प्राइवेट संस्थेचे कर्मचारी,अधिकारी कर्ज परतफेड करण्यासाठी प्रेशर देत आहे. आणि लॉकडाउन असल्याने लोकांनचे काम धंदे बंद आहे लोकांच्या मजूरी बंद आहे. त्यांना दोन वेळ च खान्यासाठी त्यांना अन्न मिळत नाही आहे तर या प्राइवेट संस्थांना कर्ज फेड करणार तरी कुठून. कितीही संस्थेच्या कर्मचारांना कारणे सांगितली तरीही ते ऐकायल तयार नाही आहे. या लोकांनच्या प्रेशरमुळे काही लोकं टेंशन घेऊन आत्महत्या करत आहे. काही लोकं घर सोडून पळून जात आहे . घरोघरी नवरा बाईकोचा वादविवाद चालू आहे. ज्या घरी कोविड पेशंट आहे आणि कोविडमुळे काही लोकं दगावले आहे त्यांच्या घरी दुःखाचे वातावरण असल्याने ही प्राइवेट संस्थेचे कर्मचारी परीशान करत आहे. जो पर्यन्त पैसे देत नाही तो पर्यन्त त्यांनच्या घरी बसून राहत आहे.त्यांना गंध्या-गंध्या शीविगाळ करत आहे. अश्या वतावर्नावर प्रशाशनाने लक्ष दयावे, आणि लॉकडाउन च्या काळात जोर जबरदस्तिने पैसे वसुलण्यात बंदी आणावी. आणि अश्या परिस्थितीत जो कोणी प्राइवेट संस्थेच्या व्यक्ति या बचत गट संस्थेचे व्यक्ति या प्राइवेट फाइनांस चे कर्मचारी परीशान करत असेल किव्हा शीविगाळ करत असेल तर त्या कर्मचारी , अधिकारी यांनच्यावर दंडात्मक कारवाही करण्यात यावी. आणि या लॉकडाउन च्या वेळेस सर्व संस्थेला विनंती आहे की कोणालाही परीशान नाही करावे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर