जागतिक पुस्तकदिन ! जगाच्या पाठीवर जे socio – political – Leaders होऊन गेले ते या महा ज्ञानभांडाराच्या पासंगालाही पुरत नाही !!
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 23 एप्रिल 2021
35 हजारांहून अधिक पुस्तकांसाठी ‘राजगृह’ उभारणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल.” हा क्रांतिकारी संदेश देणा-या आणि “आजन्म विद्यार्थी” राहिलेल्या बाबासाहेबांचे जग आज मनोभावे स्मरण करीत आहेत.ज्ञानसूर्याच्या ग्रंथसंपदेवर एक नजर …
कास्ट्स इन इंडिया (१९१७),
स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज (१९१८), द प्रॉब्लम ऑफ द रूपी (१९२३),
दि इव्हॉलुशन ऑफ द प्रव्हिन्शिअल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया(१९२४), वेटिंग फॉर अ व्हिझा (१९३५-३६),
इनहेलिशन ऑफ कास्ट (१९३६), मिस्टर गांधी ॲंड दी इमॅन्सीपेशन ऑफ दी अनटचेबल्स(१९४५), रानडे, गांधी ॲंड जिन्ना (१९४३),
थॉट्स ऑन पाकिस्तान (१९४०),
व्हाट कॉंग्रेस ॲंड गांधी हॅव्ह डन टू दि अनटचेबल्स (१९४५),
महाराष्ट्र एज ए लिंग्विस्टिक स्टेट (१९४५), हू वेअर दि शुद्राज? (१९४६), स्टेट्स ॲंड माइनॉरिटीज (१९४७),
हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी ॲंड बॅंकिंग (१९४७), द अनटचेबल्स: हू वेअर दे ॲंड व्हाय दे बिकम अनटचेबल्स(१९४८), थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट (१९५५),
बुद्ध ॲंड कार्ल मार्क्स (१९४६),
कम्युनल डेडलाक ॲंड वे टू सॉल्व इट (१९४५),
बुद्ध ॲंड दी फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०), •फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रैसी (१९५१),
•लिंग्विस्टिक स्टेट्स नीड्स फार चेक्स ॲंड बॅलेन्सेज (१९५३),
•बुद्धिज्म ॲंड कम्यूनिज्म (१९५६),द बुद्धा ॲंड हिज धम्मा (१९५७), हिंदू वुमन: राइजिंग ॲंड फॉल .तर ही झाली बाबासाहेबांची ग्रथसंपदा !
राइटिंग्ज अँड स्पिचेस वेगळे !! शासनाने अजूनही बरेच साहित्य प्रकाशित केले नाही . जगाच्या पाठीवर जे socio-political leaders होऊन गेले ते या ज्ञानभांडाराच्या पासंगालाही पुरत नाहीत ! विशेष म्हणजे केवळ लेखन एवढेच बाबासाहेबांना काम नव्हते; तर एकाचवेळी अध्ययन, सामाजिक लढे, सभा-परिषदा आणि भारताचे संविधानही त्यांना लिहायचे होते !! जागतिक पुस्तक दिना निमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणाचे स्मरण करत शुभेच्छा ll दि.२३-४-१९३३ ला मुंबई येथील दामोदर हॉल मागील भव्य पटांगणातील सभेत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाण्याचे निमित्त साधून,त्यांना मानपत्र व थैली अर्पन करण्यात आली.सभेत बाबासाहेब म्हणाले की,माझा मागासवर्गियांच्या हक्कांचा लढा यशस्वी होत असल्यामुळे मला आता माझी शक्ती देशहिताच्या कार्याकडे खर्ची घालायची आहे.
बाबासाहेबांचे सोपारे(वसई) येथे सुध्दा भाषण झाले.त्यांत ते जनतेला म्हणाले की,तुम्ही आपल्या बुध्दीचा उपयोग भाकर,शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्यासाठी करा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र व समाज हितासाठी, देशविदेशात जाऊन शिक्षणाचे शिखर गाठले.त्यांच्या पश्चात मात्र ते कार्य थंडावले आहे.कारण त्यांनी उर्वरीत कार्याची जबाबदारी आपणावर सोडली होती,ती जबाबदारी पार पाडण्यास आपण असमर्थ ठरलो आहोत.परंतू वेळ अजून गेली नाही.आपण सर्व सुज्ञ मंडळींनी एकसंघतेने- मैत्री भावनेने विचारविनिमय करून मार्ग शोधुया. 🇪🇺डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…
1 मंदिर बांधणे म्हणजे…
1000 भिकारी तयार करणे..
आणी 1ग्रंथालय बांधणे म्हणजे..लाखो विद्वान निर्माण करणे होय…!
🌹वाचाल तर वाचाल
📚जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा