चंद्रपुरात कोरोना ग्रस्त रुग्णाचा स्वताच्यास गाडीत मृत्यु
Summary
चन्द्रपुर :- चंद्रपुरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दवाखान्यासाठी भटकंती केल्यानंतरही बेड मिळु शकला नाही. आणि त्या नंतर कोरोना ग्रस्त रुग्नाला स्वताच्याच गाडीतच आपले प्राण सोडावे लागले. चंद्रपुरातील नागिनाबाग़ परिसरातील 40 वर्षीय व्यक्तिचा उपचारासाठी बेड न मिळाल्याने त्यांच्यातच गाडीत मृत्यु […]
चन्द्रपुर :- चंद्रपुरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दवाखान्यासाठी भटकंती केल्यानंतरही बेड मिळु शकला नाही. आणि त्या नंतर कोरोना ग्रस्त रुग्नाला स्वताच्याच गाडीतच आपले प्राण सोडावे लागले. चंद्रपुरातील नागिनाबाग़ परिसरातील 40 वर्षीय व्यक्तिचा उपचारासाठी बेड न मिळाल्याने त्यांच्यातच गाडीत मृत्यु झाल्याची दुःखद घटना चंद्रपुरात सोमवारच्या पहाटे घडली.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून अनेक घरातला कर्ता धर्ता व्यक्ति जात असल्यामुळे परिवारावर
शोककळा पसरत आहे. यसोबत आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली असून ऑक्सीजन व्हेंटिलेटर नसल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे. मृत्युनंतर नातेवाईकांनी शासकीय कोविड़ रुग्णालय परिसरातच टाहो फोडला.
काल ब्रम्हपुरीत देखील पॉझीटिव रुग्नाला उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळे बस स्टैंड वर आपला जिव सोडावा लागला होता. तर चंद्रपुरात देखील उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळे प्रवीण दुर्गे यांना आपल्या गाडीतच जिव सोडावा लागल्याची दुःखद घटना घडली आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर