शासकीय रुग्णालयातील अधिक्षक सचिन बालबुधे यांच्याशि चर्चा करून नगरपरिषद तुमसर ची नेहरू विद्यालय येथे हॉस्पिटल सुरु करण्याची सोय करून दिली
तरी सुद्धा रुग्णाला उपचार करण्याकरिता हॉस्पिटल उपलब्ध होत नाही आहेत कारण सर्व ठिकाणी रुग्णाची संख्या भरपूर असल्यामुळे सर्व हॉस्पिटल रुग्णानि फूल झालेले आहेत ही सर्व परिस्थिति लक्षात घेत तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे यांनी तुमसर मधे हॉस्पिटल चालवित असलेले डॉ. नीतिनजी शरणागत यांना विनंती केली की आपन तुमसर मधे कोविड हॉस्पिटल सुरु करा व रुग्णाला इथेच उपचार द्या त्यांनी सुद्धा प्रदीपजी पडोळे यांच्या विनंती मान्य करून आपली इथेच हॉस्पिटल सुरु करण्याची तयारी दाखवली व मला जागा उपलब्ध करून द्या अशी विनंती केली या वेळी नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे यांनी जिल्हाधिकारी संदीपजी कदम साहेब,उपविभागीय अधिकारी श्री.नीतिनजी सदगीर साहेब व शासकीय रुग्णालयातील अधिक्षक सचिन बालबुधे यांच्याशि चर्चा करून नगरपरिषद तुमसर ची नेहरू विद्यालय येथे हॉस्पिटल सुरु करण्याची सोय करून दिली यावेळी डॉ. नितिन शरणागत यांनी नगराध्यक्ष प्रदीपजी पडोळे व माजी नगराध्यक्ष अमरजी रगड़े यांच्या सोबत नेहरू शाळेची पाहणी करून हॉस्पिटल सुरु करण्याकरिता होकार दिला व येणाऱ्या तीन ते चार दिवसात कोविड हॉस्पिटल सुरु करण्या संबधित लागणारी तयारी करून 30 ते 40 बेड चे हॉस्पिटल सुरु करण्यात येईल असे सांगितले यामुळे तुमसर मधेच कोरोना रुग्णाचे उपचार करता येईल व त्यांना वैद्यकीय सेवा देता येईल व त्यांना उपचारा करिता बाहेर फिरावे लागणार नाही.