” शासनाचा हलगर्जीपणा सामान्य जनतेचे बेहाल?
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. १६ एप्रिल २०२१
आजची एकंदरीत परिस्थिती पाहता खुपच बिकट आहे. जनता प्रत्येक वेळी शासनाच्या निर्णयाचे स्वागतच करते. परंतु प्रश्न पडतो की ही यंत्रणा सक्षम आहे कि नाही ?
आणि आहे तर सामान्य माणसा ला याचा उपयोग किंवा फायदा किती? सगळीकडे लाँकडाऊन आहे ,रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दर महागले ,फळांचे भाव बापरे!!
अशा परिस्थितीत सामान्य माणूस जगेल कसा ?
सरकारी दवाखान्यात पेशंट ची रांग लागलेली ,त्या मानाने डाॅक्टर. नर्सेसचा अभाव , अन् तेही डाँ. खाल्यांसारखे वागतात , अशावेळेस तर पेशंट तिथेच अर्धा खचतो.गरिबांकडे खाजगी दवाखान्याचा खर्च न परवडणारा.
बरं सरकारी दवाखान्यात कोरोना टेस्ट पाँझिटीव्ह आली कि औषधांच वितरण बरोबर नाही.
ज्या गोळीनी इन्फेक्शन नष्ट होतं Fabiflue ही गोळीच दवाखान्यातून मिळत नाही ,मेडीकल मध्ये ती किट 2500 रूपयाला मिळते , मग सामान्य माणूस घेऊ शकतो काय ?
ही शासनाची जवाबदारी नाही का
, प्रत्येक दवाखान्यात औषधांचा पुरवठा करण्याची .मागच्या आठवड्यापासून आजपर्यंत का औषध आली नाही का ? ठिक आहे आम्ही बाहेरून घेऊ शकतो , हातावर पोट घेऊन जगणारे भुकेने मरतील तर काही औषधाविना .आज प्रत्येकाच्या घरात रूग्ण आहेत ,आणि घरात एक पाँझिटीव्ह असला की इतरही पाँझिटीव्ह होतातच . म्हणून शासनाची जवाबदारी आहे की पूर्ण यत्रणेनिशी काम करायला पाहीजे ,काम करणा-यांची कमी नाही तर सरकारी नियोजनाची गरज आहे .
खुप काही करण्यापेक्षा , सामान्यांचे बेसिक प्रश्न महत्वाचे आहेत , ते सोडविले गेले पाहिजेत .पण आम्ही बोलायलाच विसरलो , आमदार , खासदार आपले काम करतातच ,आम्हा कष्टक-यांच्या वाट्यावर अडाणी ,अंबानी जगतातच ,
मग आपलं काय ,आज आम्ही बोललो नाही तर ,उद्याचा दिवस भयंकर कठीण असेल .
मी तर बोलणारच ,पहा तुम्हाला काय जमते?