गुढ़ीपाड़वा समर्थक लोकांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी – — निलेश सोनटक्के, संभाजी ब्रिगेड.
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. १४ एप्रिल २०२१
महाराष्ट्राच्या बाहेर हिंदू नाहीत का ? फक्त महाराष्ट्रातच हिंदू आहेत का ? गुडीपाडवा हा जर हिंदू सन आहे तर नेपाळ तर हिंदू राष्ट्र आहे मग तेथे पाड़वा साजरा का होत नाही ? महाराष्ट्रा ऐवजी दुसऱ्या राष्ट्रात हिंदू नाहीत का ?
हिंदू धर्मात शुभ असलेला सरळ तांब्या गुढ़ीवर उलटा कसा ? हिंदू धर्मात प्रेताच्या तिरडीसाठी वापरले जाणारे बांबू शुभ मानल्या जाणाऱ्या गुढ़ीला उपयोगी कसे ?
दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात या सणाला मराठी नवीन वर्षसुद्धा म्हणतात. पण खर्या इतिहासाच्या मुळाशी जायचं म्हटलं तर या दिवसापर्यंत तब्बल चाळीस दिवस कैद केलेल्या शंभू राजांना आबाजी भट्ट आणि रंगनाथ स्वामी या ब्राम्हणांच्या सांगण्यावरुन मनुस्मृति नुसार छळल्या गेले. अनन्वित अत्याचार केले. डोळे काढले, जीभ छाटली, नखे काढ़ली, कानात तेल ओतलं, चमड़ी सोलली अन् अखेर 11 मार्च 1689 या दिवशी वडू बुद्रूक
तुळापूर येथे शंभू राज्यांचं मस्तक कलम केल्या गेले. इंद्रायणी-भीमेला रक्ताचा अभिषेक झाला. अन् अखेर फाल्गुन वद्य अमावस्या 12 मार्च 1689 हा दिवस उगवला या दिवशी छाटलेलं शंभू राज्यांचं मस्तक भाल्याच्या टोकावर अडकवलं गेलं व गावागावातून मिरवणूक काढली. अंततः भाल्याच्या टोकाला अडकवलेलं ते मस्तक रक्ताने न्हाऊन निघालेल्या इंद्रायणी-भीमा तिरावर आणलं गेले होते.आणि तोच भाल्याचा फाळ तिरावर रोवला गेला ..भाल्यावर अडकवलेलं शंभूराज्यांचं मस्तक, बांबूपासून बनलेला तो भाला अगदी हेच स्वरूप भटांनी गुढ़ीला दिले. अन् पाहता पाहता अशुभ असलेला उलटा तांब्या शुभ झाला. स्त्रियांची अब्रू असलेली साड़ीचोळी गुढीवर टांगण्यात आली. मात्र हे सर्व कुणाच्या दृष्टीस आलंच नाही आणि ज्यांनी हे दृष्टीस आणून दिले त्यांना इथल्या मनुवादी व्यवस्थेने हिंदुद्रोही-समाजद्रोही ठरवलं.. सर्व काही खोट्या धार्मिक अस्मितेच्या नावावर बहुजनांनी गिळंकृत केलं. वास्तविक इतिहास बाजूला गेला.. आणि हाच दिवस मनुवादी ब्राम्हणांनी ‘मराठी नवीन वर्ष’ या नावाने मराठी जनांच्याच मस्तकी मारला. पुढे हा दिवस हिंदू नवीन वर्ष दिन सुद्धा झाला. आणि आम्ही बहुजन विचार न करता मोठ्या उल्हासात गुढीपाडवा साजरा करतो. म्हणजे शंभू राजांचा स्मृतिदिन मोठ्या आनंदाने साजरा करतो. म्हणजे आमच्या राज्यांचं बलिदान व्यर्थ झालं की काय ? हा आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे. तरी कृपया कुणीही गुढीपाडवा हा दिवस सण म्हणून साजरा करू नये….
दोन ओळी राजासाठी..
जनभक्तिचे तुशावरीनच उधाणले भान रियासतीवर नसे नोंदले तुझे कुणीच नाव जरी न गाति भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले सफल तुझे रे तुझेच रे बलिदान .अशा संभाजी राजाला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा .(शब्दांकन: निलेश सोनटक्के संभाजी ब्रिगेड, यवतमाळ)