जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष – उपाध्यक्षांचा विविध मंत्र्यांकडून सत्कार
सिल्लोड (शेख चांद प्रतिनिधी ) दि.7, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अर्जुनराव पा. गाढे यांनी मुंबई येथे औरंगाबादचे पालकमंत्री तथा उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई ,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयातील कार्यालयात भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील तसेच उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे यांचा सन्माननीय मंत्री महोदयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,आमदार अंबादास दानवे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक दिनेश सिंग परदेशी , जावेद पटेल,आदी उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील आणि उपाध्यक्ष अर्जुनराव गाढे पाटील यांचा औरंगाबादचे पालकमंत्रीj तथा उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात सत्कार केला. यावेळी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, आमदार अंबादास दानवे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक दिनेश सिंग परदेशी आदी उपस्थित होते.