‘उद्धव साहेबांबद्दल बोलताना भान ठेवा नाहीतर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ’
Summary
मुंबई: मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. ते अपघाताने मुख्यमंत्री बनले आहेत अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेला शिवसेनेचे नवीन पनवेल शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले […]
मुंबई: मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही. ते अपघाताने मुख्यमंत्री बनले आहेत अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेला शिवसेनेचे नवीन पनवेल शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे
उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर आरोप करताना चंद्रकांत पाटलांनी भान ठेवावे.अन्यथा शिवसैनिक थोबाड फोडतील उद्धव साहेब ठाकरे यांच्यावरील टीका शिवसैनिक सहन करणार नाही. शिवसैनिक रस्तावर उतरून भाजपला उत्तर देतील,’ असा सज्जड इशारा शिवसेनेचे नवीन पनवेल उपविभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी दिला आहे.
भाजपची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. सत्तेविना भाजपची मंडळी तडफडत आहेत. शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरुन भाजपचे महाराष्ट्रात राजकारण सुरू झाले होते याचे त्यांनी स्मरण ठेवावे. प्रबोधनकार ठाकरे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना समाजकारण, राजकारणाचे बाळकडू मिळाले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे व राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. दरम्यान सत्तेवर असताना भाजपच्या नेत्यांनी काय कर्तृत्व दाखविले हे राज्यातील जनता चांगलीच ओळखून आहे. चंद्रकांत पाटील हे राज्यातील अत्यंत खोटारडे नेते म्हणून ओळखले जातात
असा घणाघात प्रशांत जाधव यांनी केला