BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

फडणवीस साहेब कोरोना तज्ञांना सोबत घेऊन नागपूरात तरी आपला पॅटर्न दाखवला का❓ राजेश कदम यांचा प्रश्न

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. ४ एप्रिल २०२१ आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, सोबत भाजपची सत्ताही आहे..बाकी जिथे …जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, वर्चस्व आहे. आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम.
दि. ४ एप्रिल २०२१
आपल्या लाडक्या विदर्भातील आपले स्वतःचे शहर नागपूर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे, सोबत भाजपची सत्ताही आहे..बाकी जिथे …जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, वर्चस्व आहे. आज घडीला नागपूरमध्ये ४० हजार ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत, रोजच्या रोज येथे तीन ते चार हजार रुग्णांची भर पडत आहे.. कित्येक लोक मरत आहेत. हे तरी नाकारले जाऊ शकत नाही. आपल्या जवळील सार्वजनिक सेवा उपलब्ध करून उपचार करून दाखवू शकतात असे सर्व कोरोना तज्ञ म्हणजे तुमचे प्रवीण दरेकर,आशिष शेलार,नारायण राणे, किरिट सोमय्या, छोटा राणे, गोपीचंद पडळकर,अतुल भातखळकर,केशव उपाध्ये ह्या सर्वांना नागपूर मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली घेऊन जा, आवश्यकता लागल्यास इतर छोट्या मोठ्या पक्षातील पण अनेक तज्ञ आहेत ज्यांचा कोरोनावर प्रचंड गाढा अभ्यास आहे, या सर्वांना सोबत घ्या. आणि नागपूर मध्ये कोरोना संक्रमणावर एक महिन्यात नियंत्रण मिळवून दाखवा, कारण या सर्व तज्ञ मंडळींकडे अनेक उपाय आहेत, रेल्वे,देऊळ,बस,दुकाने,फेरीवाले व इतर सर्व अस्थापना हे बंद न करता म्हणजेच लॉक डाऊन न करता १०१ आयडिया असतीलच.?? विशेषतः तुमच्या मोदी सरकारची म्हणजेच केंद्र सरकारची सुद्धा मदत घेवून दाखवून द्या संपूर्ण जगाला हा फडणवीस कसा चमत्कार घडवून आणतो ते ??, जरा दाखव ना काहीतरी करून तिथे,(आम्हाला माहिती आहे तुम्ही एकटे ही करू शकता) जसे महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका अभिमानाने धारावी पॅटर्न सांगते तसंच आम्ही सुद्धा आपण जर नागपुर वर नियंत्रण मिळवले तर ‘फडणवीस पॅटर्न’ म्हणून तुमचे कौतुक करू. देवेंद्र फडणवीस साहेब,!! महाराष्ट्राला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही फक्त राजकारण करताना दिसत आहात, अहो सत्ता काय येते जाते, तुमच्याच काय ? तुमच्या जवळील अनेकांच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं ? पाच वर्षात तुमची सत्ता जाईल म्हणून. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस कोरोनाच्या भयंकर विळख्यात आहे, कोरोना विषाणू बघत नाही हा भाजपचा आहे का शिवसेनेचा, तोंडाच्या वाफा चालवण्यापेक्षा, विरोधात बोलण्यापेक्षा खरच महाराष्ट्राचे एक लाडके माजी मुख्यमंत्री म्हणून एक आदर्श घालून द्या, दाखवून द्या नागपूर पॅटर्न, जबाबदारीने काहीतरी केलेत तर खरोखरच तुमचा डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध आप्पा दातार चौकात म्हणजेच फडके पथावर भव्य दिव्य ठेवू…असे स्पष्ट विचार राजेश कदम माजी सभापती, परिवहन समिती कडोंमपा. डोंबिवली यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *