BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

देश विकायला लागलेल्या पंतप्रधान मोदींची वटवट?? विनोद दुआ.

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ४ मार्च २०२१ देशात कोणत्याही प्रकारची विकास योजना आखली जाण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी गेली पाच वर्षे,सातत्यानं सभा -सेमीनार्स मधून,सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही असा बकवास करतात. या खंडप्राय […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ४ मार्च २०२१
देशात कोणत्याही प्रकारची विकास योजना आखली जाण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधान मोदी गेली पाच वर्षे,सातत्यानं सभा -सेमीनार्स मधून,सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही असा बकवास करतात. या खंडप्राय देशाचा सतत अपमान करित आलेत…. मी मोदींची ती चूक सुधारत,मोदिंच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना काही गोष्टी विनोद दुआ सांगु इच्छितात…..मोदीजी,
तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच, तेव्हा जन्म ही झाला नव्हता..कदाचित तेव्हा पाळण्यात असणार बहुधा मोदीजी, कदाचित सहा महिन्यांचे असणार ,तेव्हा या देशांकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं…ते साल होतं १९५०
मोदी चार वर्षांचे… म्हणजे १९५४ ला, तर मोदीजी,या वर्षी या देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन होऊन ते कामाला सुद्धा लागलं होतं…
मोदी साहेब, ुम्ही ११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल तेव्हा,तर मोदीजी, तुम्ही अकराचे होता, त्यावेळी या देशात, डझनभर आय आय टी,आय आय एम,उघडली गेली होती,सेकडो विद्यापीठं उघडली गेली होती आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले , त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला, (आता तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला जो “मोदी मोदी” जल्लोष ऐकायला येतो ना ,तो याच नतदृष्टांचा….) तर मोदीजी, या देशात पहिली आय आय टी सुरू झाली खरगपूरला १९५० साली आणि पहिली आय आय एम सुरु झाली,१९६१साली कलकत्त्यात.. आय आय एम म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट…!
मोदीजी,याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून,गोवा, या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होता…मोदीजी, तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं , भाकरा नानगल नावाचं महाप्रचंड धरण बांधून झालं होतं…१९६२-६३

मोदीजी, तुम्ही चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंबलिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली..१९६४.
तुम्ही पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजानी लाहोर पर्यंत धडक दिली होती… लाहोर पाकिस्तान नावाच्या देशात आहे आणि आपले उपोषण सम्राट अन्ना हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हवर होते….मोदीजी तुम्ही १९ वर्षांचे असाल तेव्हा…. तेव्हा या देशात १९६९ साली, तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं…मोदीजी, तुम्ही २१ चे झालात, या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या,या देशाच्या एका बुलंद पंतप्रधानानी, पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून,बांगला देश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला… धर्माधिष्ठित संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान ,त्याचे दोन तुकडे होत असताना धर्म बिलकुल आडवा आला नाही बरं का..

मोदीजी,
तुम्ही २४ वर्षांचे झालात आणि या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का…ते साल होतं १९७४.

मोदीजी, तुम्ही आता ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला वगैरे..तर त्या दरम्यान,या देशात राजीव गांधी नावाच्या पंतप्रधानानी , सुपर कॉम्प्युटर आणि इनफाॅरमेशन टेक्नॉलॉजी नावाची नभूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतिच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली……

राजीवजींचा खून झाला, नरसिंह राव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे पंतप्रधान झाले, देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता,या देशाचं सोनं जागतिक बँकेकडे गहाण ठेवावं लागलं होतं पण तुम्हाला सांगतो मोदीजी, डॉ.मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री , नरसिंह रावांच्या मंत्री मंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या पंतप्रधानांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं हो…..

हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का….

याच दरम्यान,मोदीजी,या देशात, चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, जहाजे,सबमरिन्स, पृथ्वी,अग्नी,पिनाक,नावाची मिसाईलस्, तेजस,चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई,मिग,नावाची फायटर विमानांची निर्मिती, अहो नुसती रेलचेल हो..काय आणि किती सांगू….

बरं असो मोदीजी आता पण शेवटचा एक प्रश्न विचारतो….

मोदीजी देशात झालेली ही अल्प,स्वल्पशी प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही ?

आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून ,कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता?
पुढे २०१४ च्या मध्यावर खुद्द नरेंद्र दामोदरदास मोदीच या देशाचे पंतप्रधान झाले आणि पुढचं तुम्हाला ठाऊक आहे,मी कशाला सांगू….७०वर्षात काय केले?

जे केले तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना, स्वतःची थापांशिवाय कोणतीच बोंब पडली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *