देवचंद धर्माजी मेश्राम यांना आत्महत्या करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या साथीदाराला ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल होऊन सुद्धा तात्काळ अटक होत नसल्याबाबत.
Summary
प्रति, 1)मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर 2) मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर. विषय : श्री. देवचंद धर्माजी मेश्राम यांना आत्महत्या करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या साथीदाराला ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल होऊन सुद्धा तात्काळ अटक होत नसल्याबाबत. महोदय, ब्रम्हपुरी […]
प्रति, 1)मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर 2) मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर. विषय : श्री. देवचंद धर्माजी मेश्राम यांना आत्महत्या करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी व त्यांच्या साथीदाराला ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल होऊन सुद्धा तात्काळ अटक होत नसल्याबाबत. महोदय, ब्रम्हपुरी -पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक यांच्यासह इतर 3 लोकांविरुद्ध श्री. देवचंद धर्माजी मेश्राम, प्राथमिक शिक्षक, ब्रम्हपुरी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकारणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2021 रोजी अट्रॅसिटी व आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न केल्याचा चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा कुडेसावली येथे कार्यरत सहाय्यक शिक्षक देवचंद धर्माजी मेश्राम यांनी 2 एप्रिल 2021 ला पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी जवळील कोट तलावात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी देवचंद मेश्राम यांनी चिट्ठी लिहून त्या चिट्ठीत प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट व इतर यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत आहे असे लिहून ठेवले आहे. यापूर्वी सुद्धा प्रमोद नाट यांच्याविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये 10 मार्च 2021 रोजी अट्रॅसिटी चा गुन्हा दाखल झाला होता. तरीही त्याला अटक झाली नाही. त्याच्या विरुद्ध अनेक भष्ट्राचार व अनियमितता केल्याच्या तक्रारी असताना जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्या विरुद्ध निलंबनाची कोणतीही कारवाई केली नाही. ह 14 एप्रिल 2021 पासून जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल.प्रमोद नाट यांच्यावर दुसरा अट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झालेला असून पोलीस प्रशासन त्याला अटक करण्याऐवजी त्याला अटक पूर्व जामीन कशी मिळेल यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पोलीस प्रशासनाचे दिसून येत आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजात पोलीस प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झालेला आहे. तरी प्रमोद नाट व त्याच्या साथीदाराला तात्काळ अटक न झाल्यास 14 एप्रिल 2021 पासून जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल तरी तात्काळ अटक करावी. ही विनंती.