महाराष्ट्र हेडलाइन

मोहफुल गोळा करण्याऱ्यानो सावधान! जेप्रा-दिभना येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Summary

गडचिरोली : प्रतिनिधी चक्रधर मेश्राम :- जंगलात मोहफुल वेचण्याकरीता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज २७ मार्च रोजी दिभना जंगल परिसरातील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक २ मध्ये सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शोभा नामदेव मेश्राम (५०) रा. राजगाटा माल […]

गडचिरोली : प्रतिनिधी चक्रधर मेश्राम :- जंगलात मोहफुल वेचण्याकरीता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज २७ मार्च रोजी दिभना जंगल परिसरातील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक २ मध्ये सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शोभा नामदेव मेश्राम (५०) रा. राजगाटा माल असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनूसार शोभा मेश्राम ही काल २६ मार्च रोजी जेप्रा लगतच्या जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेली होती. मात्र ती घरी परत आली नाही. काल तिचा शोध घेतला असता ती दिसून आली नाही. आज सकाळच्या सुमारास पुन्हा शोध मोहिम राबविली असता तीला वाघाने ठार केले असल्याचे निदर्शणास आले. वाघाने महिलेला ठार केल्यानंतर जवळपास एक ते दिड किलोमीटर ओढून नेल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट देउन पंचनामा केला.
सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम असल्याने ग्रामीण भागातील नागरीक पहाटेच मोहफुले वेचण्यासाठी जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे जेप्रा, दिभना, अमिर्झा परिसरातील नागरिकांमध्ये अत्यंत कडकडाडीची भिती निर्माण झाली आहे. कारण मागील चार महिण्यात अमिर्झा परिसरात वाघाने चार जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये राजगाटा येथील शेतकरी गोविंदा गावतुरे, गोगांव येथील महिला मंजुळाबाई दुधा चौधरी, धुंडेशिवणी येथील शेतकरी दयाराम धर्माजी चुधरी व राजगाटा माल येथील महिला शोभाबाई नामदेव मेश्राम यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *