महाराष्ट्र हेडलाइन

गटशिक्षणाधिकारी यांचा सायन्स किट घोटाळा दडपण्यासाठी शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद यांचा खटाटोप

Summary

ब्रम्हपुरी : पंचायत समिती ब्रम्हपुरी – नागभीड चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण अधीक्षक प्रमोद नाट यांनी ब्रम्हपुरी व नागभीड पंचायत समितीमधील मुख्याध्यापकांची सभा आयोजित करून सायन्स किट समग्र शिक्षा अभियान या खात्यातून खरेदी करण्यासाठी दबाब टाकला. सायन्स किट खरेदी […]

ब्रम्हपुरी : पंचायत समिती ब्रम्हपुरी – नागभीड चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण अधीक्षक प्रमोद नाट यांनी ब्रम्हपुरी व नागभीड पंचायत समितीमधील मुख्याध्यापकांची सभा आयोजित करून सायन्स किट समग्र शिक्षा अभियान या खात्यातून खरेदी करण्यासाठी दबाब टाकला. सायन्स किट खरेदी पूर्वी शालेय व्यवस्थापन समिती च्या सभेत ठराव होऊन, ज्या दुकानदाराकडून वस्तू खरेदी करायची असतें त्याच्याकडून कोटेशन मागावे लागते. मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन समितीच्या ठरवाप्रमाणे दुकानदाराला कोटेशन मागतो. कोटेशन प्राप्त झाल्यानंतर ते कोटेशन शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत उघडून ज्यांचे दर कमी आहे, त्याला वस्तू पुरवठा करण्याचे आदेश मुख्याध्यापक देतो. वस्तू प्राप्त झाल्यानंतर वस्तूचे देयक अदा केले जाते. परंतु या सायन्स किट खरेदी मध्ये व सायन्स किट येण्यापूर्वीच रक्कम बँक मार्फत पाठविण्यात आले. सायन्स किट खरेदी मध्ये कोणत्याही प्रकारची लेखा संहिताप्रमाणे कारवाई न झाल्याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी 20 मार्च 2020 रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही चौकशीचा प्रतिसाद दिला गेला नाही. गटशिक्षणाधिकारी यांनी नागभीड प स व ब्रम्हपुरी प स मधील मुख्याध्यापक यांची सभा घेऊन 5000/-रुपये किंमतीची सायन्स किट घेण्यासाठी निर्देश दिले. त्या प्रमाणे ब्रम्हपुरी व नागभीड पंचायत समिती च्या मुख्याध्यापक यांनी अनुप यादव, पुणे यांच्या खात्यावर 6 मार्च 2020,7 मार्च 2020 रोजी पाठविले.मुख्याध्यापक यांना वस्तू चे कोटेशन घेण्यात /देण्यात आले नाही तरीही मुख्याध्यापक यांनी त्या सायन्स किट चे 5000 रुपये कोणत्या आधारावर अनुप यादव ला पाठविले.अनुप यादव हा या खरेदी मध्ये दलालाची भूमिका बजाबली आहे. त्याची चौकशी झाल्याशिवाय या घोटाळ्याल्याची चौकशी होऊच शकत नाही. गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या . 7 मार्च 2020 च्या पत्रात 22 शाळांचे पैसे पाच हजार रुपये प्रमाणे मिळाले असे नमूद केले असून त्या प्रमाणे . 13 मार्च 2020 ते 17 मार्च 2020 पर्यंत या किट साठी प्रशिक्षण मेंढा किरमिटी घेण्यात येत असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी नमूद केली आहे.. त्या प्रशिक्षणाला प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. दीपेंद्र लोखंडे यांनी .14 मार्च 2020 रोजी भेट दिली ही बाब वर्तमान पत्रात छापली गेली. बाजारात या वस्तूची किंमत वस्तूची अंदाजे 1000 ते 1200 रुपये असून त्या वस्तूचे कोटेशन न घेता व शाळा व्य. समिती चा ठराव याप्रमाणे व लेखांसंहिता प्रमाणे कारवाई केली नाही याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली. परंतु जी प ने चौकशी न करता गटशिक्षणाधिकारी यांना वाचविण्यासाठी चौकशी प्रलंबित ठेवली.वस्तू साठी 5000/ रुपये पाठविले, परंतु 2 जून ला मुख्याध्यापक यांनी 5000 रुपये बँक मार्फत दिनांक 6 मार्च / 7 मार्च ला अनुप यादव याला पाठविले. तर मग वस्तूचे देयक अनुप यादव यांचे कडून 5000 रुपयाचे पाहिजे होते.ते वस्तूचे 4978 रुपये रुपयाचे कसे? 5000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाची वस्तू घेतल्यास त्यासाठी कोटेशन घ्यावे लागते, शाळा व्यवस्थापन समिती मध्ये ठराव घ्यावा लागतोय, परंतु हे सर्व मुख्याध्यापक यांनी केले नाही, तसेच प्रहार शिक्षक संघटनेने तक्रार दिल्यामुळे मुख्याध्यापक यांना 2 जून 2020 ला 4978 रुपये किंमती चे बिल 26-Alpha lab & educatinal pvt ltd या नावाचे 11 मार्च 2020 चे देण्यात आले. शासनाची रक्कम आपण खरेदी करण्यापूर्वी देतोय काय? बिल प्राप्त झाल्यावर आपण शासकीय रक्कम अदा करतोय. परंतु अनुप यादव ला कोणत्या आधारावर बँके मार्फत पाठविण्यात आले. हा या सायन्स किट मध्यस्ती किंवा दलाल तर नाही. त्या घोटाळ्याची माहिती जयदास सांगोडे माहिती अधिकारात मागितले होती परंतु नागभीड व ब्रम्हपुरी येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाने माहिती विहित मुदतीत दिली नाही. म्हणून अपील केली. अपील केली असता अपीलाचा आदेश होऊन दोन्हीही पंचायत समिती मधून माहिती मिळाली नाही. तसेच जयदास सांगोडे यांनी सायन्स घोटाळा व इतर घोटाळ्याची चौकशी केली असल्यास चौकशी अहवाल व शासनाकडून चौकशी करण्याबाबतची पत्र व्यवहाराची माहिती जिल्हा परिषद च्या प्राथमिक शिक्षण विभागात नोव्हेंबर 2020 मध्ये मागितली. माहिती न मिळाल्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांच्या कडे अपील दाखल केली.परंतु आज तारखेपर्यंत अपील अर्जावर शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनावणी घेतली नाही. यावरून हा घोटाळा वरिष्ठ अधिकारी यांच्या आशिर्वादामुळे झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी लाचलुचप्रतिबंधक विभागाकडून तसेच शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या मार्फत केल्यास मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद अधिकारी यांचा सहभाग आढळून येईल. वरिष्ठ अधिकारी यांच्याच आशिर्वादामुळे गटशिक्षणाधिकारी भष्ट्राचार खुलेआम करीत करीत असून जिल्हा परिषद प्रशासन या गटशिक्षणाधिकाऱ्याला जिल्हातील उत्कृष्ट गटशिक्षणाधिकारी म्हणतात. त्यामुळेच जिल्हाचे पालकमंत्री यांनी 11 डिसेंबर ला मुख्यकार्यकारी अधिकारी यांना तात्काळ प्रभार काढण्याचे निर्देश दिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठ दिवसात प्रभार काढण्याचे आश्वासन पालकमंत्री यांना दिले होते. परंतु आश्वासन मुख्य कार्यकारी यांनी पाळलेच नाही.त्यामुळेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःचा भष्ट्राचार लपवण्यासाठी जयदास सांगोडे यांच्यावर खोटा व बनावट गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *