BREAKING NEWS:
महाराष्ट्र

शेतक-यांसाठी करताेयं दयानंद राठाेड सातत्याने धडपड!

Summary

 जिवती तालुका ग्रामीण प्रतिनिधी गोविंद बापूराव गोरे सध्या शेती हंगामाची कामे आटाेपली असुन शेतकऱ्यांना आता पाेटाची खळगी भरण्यासाठी राेजगाराची आवश्यकता निर्माण झालेली आहेत.त्यांचे कुंटुबांचा उदार निर्वाह चालवा या साठी अति दुर्गम भागातील जिवती येथील दयानंद राठोड़ सातत्याने धडपड करीत असल्याचे […]

 जिवती तालुका ग्रामीण प्रतिनिधी

गोविंद बापूराव गोरे

सध्या शेती हंगामाची कामे आटाेपली असुन शेतकऱ्यांना आता पाेटाची खळगी भरण्यासाठी राेजगाराची आवश्यकता निर्माण झालेली आहेत.त्यांचे कुंटुबांचा उदार निर्वाह चालवा या साठी अति दुर्गम भागातील जिवती येथील दयानंद राठोड़ सातत्याने धडपड करीत असल्याचे प्रत्यक्षात दिसुन आले .दरम्यान त्या युवकाने गावातील काही बेरोजगारांना या पुर्वि रोजगार हमी योजनेचे काम मिळवून दिले होते. अजुनही काही  शेतकरी  रोजगार मिळावा म्हणुन दिवसा गणिक येत असल्याचे दयानंद राठाेड यांनी आज या प्रतिनिधीस सांगितले . परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता सदरहु युवकाने रोजगाराची मागणी कशी करायची याबाबत  याेग्य ते मार्गदर्शन त्या शेतक-यांना केले .

एव्हढेच नाही तर या भागातील तहसीलदार ,सभापती , उपसभापती व कार्यक्रम अधिकारी (रोजगार हमी योजना) यांना प्रत्यक्ष भेटुन त्यांनी संपूर्ण जिवती तालुका मध्ये रोजगार हमी योजना 100% राबवावी , प्रत्येक शेतकरी बेरोजगार मजुरांना काम मिळावे. व ज्यांना या योजनेची माहिती नाही. त्यांना ही योजना माहिती करण्यासाठी काही उपाय योजना कराव्या अश्या आशयाचे निवेदने सादर केले . 

एकंदरीत दयानंदची धडपड खराेखरंच वाखाण्याजाेगी आहे असे म्हटल्यास ते कदापिही अतिशाेक्तिचे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *