BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

भविष्यातील दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त झाल्या पाहिजेत… डॉ. अनिल रुडे.

Summary

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्गरोग कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक आरोग्य दिन आणि मौखिक आरोग्य जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुलांना धूम्रपानामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर भावी पिढी सुदृढ […]

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय असंसर्गरोग कार्यक्रमांतर्गत जागतिक मौखिक आरोग्य दिन आणि मौखिक आरोग्य जनजागृती सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुलांना धूम्रपानामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त झाल्या तर भावी पिढी सुदृढ तयार होईल. तंबाखू, दारु, गुटखा आणि अन्य धूम्रपानामुळे मानवी जीवनात अनेक नैराश्य, आजार, शारीरिक ,कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक शाळा तंबाखूमुक्त होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी आपल्या अध्यक्ष पदावरून व्यक्त केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. सतिश सोलंके, डॉ. धुवेऀ, डॉ. ढबाले, डॉ. नंदु मेश्राम, सुभेदार आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना डॉ. रुडे पूढे म्हणाले की, जिल्हा सामान्य रुग्णालयात दर बुधवारी मौखिक रोगांची तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या वतीने केली जाते. त्यानंतर मौखिक आणि त्यासंबंधीच्या कॅमेरा सारख्या मोठ्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाना मेघे हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी पाठविले जाते. शाळांमध्ये विविध प्रकारचे आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येत असून, शालेय स्तरावर आरोग्य विषयक उपक्रमात विद्यार्थी सहभागी होण्यासाठी शालेय प्रशासनाने, प्रमुखांनी प्रत्येक्ष पुढाकार घेऊन भावी पिढी व्यसनमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. असे मत डॉ. रुडे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मौखिक आजाराने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. २७ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी मौखिक आजाराविषयी जनजागृती केली जाणार आहे. यात तंबाखूमुक्त करण्यासाठी तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना तज्ञ डॉक्टर्स कडून तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिना दिवटे यांनी तर आभार रिना मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका., आणि ईतर बऱ्याच कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

गडचिरोली
प्रतिनिधी
चक्रधर मेश्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *