शालेय पोषण अधीक्षक यांच्या निलंबणासाठी 14 एप्रिल पासून पालकमंत्री यांच्या कार्याल्यासमोर आमरण उपोषण
Summary
ब्रम्हपुरी – नागभीड पंचायत समिती चे शालेय पोषण आहार अधीक्षक तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करून सेवेतून निलंबीत करण्यात यावे यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, […]
ब्रम्हपुरी – नागभीड पंचायत समिती चे शालेय पोषण आहार अधीक्षक तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करून सेवेतून निलंबीत करण्यात यावे यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री व जिल्हा चे पालक मंत्री यांना निवेदन देण्यात आले असून प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ निलंबीत न केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2021 पासून जिल्हा चे पालकमंत्री ना. विजय भाऊ वड्डेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.गटशिक्षणाधिकारी यांनी सायन्स किट खरेदी मध्ये मोठया प्रमाणात भष्ट्राचार व अनियमितता झाल्याने प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व शासनाकडे एक वर्षांपासून तक्रारी करण्यात आल्यात परंतु तक्रारीची दखल घेण्यात येत नसल्यामुळे जिल्हाचे पालकमंत्री ना. विजय वड्डेट्टीवार यांना 11 डिसेंबर 2020 रोजी निवेदन देण्यात आला त्या निवेदनाची पालकमंत्री यांनी दखल घेऊन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ पाचरण करून पालकमंत्री कार्यालयात चर्चा करून भष्ट्राचारी शालेय पोषण आहार अधीक्षक तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना 8 दिवसात हटवून चौकशी करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पालकमंत्री यांच्या समक्ष संघटनेला आश्वासन दिले होते. ते आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पा ळले नाही. सायन्स किट भष्ट्राचार माहिती माहितीच्या अधिकारात गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांना जयदास सांगोडे , जिल्हा अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना यांनी मागितली होती परंतु विहित मुदतीत माहिती अधिकारातील माहिती मिळाली नाही.ती माहितीघेऊन जाण्यासाठी 20 जानेवारी 2021 रोजी माहिती अधिकारी यांनी सायंकाळी 6:07 मिनिटांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईल वरून वरील माहिती संदर्भात फोन केला. परंतु कार्यालय बंद होण्याची वेळ असताना माहिती अधिकारी यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईल वरून फोन करण्याचा उद्देश चांगला दिसून येत नसल्यामुळे जयदास सांगोडे हे पंचायत समिती कार्यालयात गेले नाही. तरीही शालेय पोषण आहार अधीक्षक तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी जयदास सांगोडे यांच्या विरुद्ध खोटा व बनावटी गुन्हा दिनांक 21 जानेवारी 2021 ला पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे गुन्हा दाखल करून जयदास सांगोडे यांना फसविण्यासाठी प्रयत्न केला. जयदास सांगोडे यांच्या विरुद्ध विरुद्ध खोटा, बनावट गुन्हा दाखल झाल्यामुळे, प्रमोद नाट, शालेय पोषण आहार अधीक्षक तथा गटशिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी / नागभीड यांच्या आर्थिक गैर व्यवहाराच्या तक्रारी मागील एक वर्षांपासून जिल्हा परिषद, शासनाकडे व मा. मंत्री महोदय यांचेकडे करीत असल्यामुळे, गटशिक्षणाधिकारी यांनी चिडून जाऊन कारवाई टाळण्यासाठी खोटा, बनावटी गुन्हा दाखल करून त्या एफआयआर च्या आधारावर जयदास सांगोडे यांच्या वर कारवाई करावी याच उद्देश ठेवून खोटी तक्रार दिल्याची तक्रार पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे 23 जानेवारी 2021 रोजी दाखल केली होती. पोलिसांच्या वतीने तक्रारीची सहानिशा करून श्री. प्रमोद नाट, गटशिक्षणाधिकारी प स. ब्रम्हपुरी यांची दि.21 जानेवारी 2021 ची तक्रार खोटी आढळून आल्यामुळे, प्रमोद नाट, गटशिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध पो स्टे ब्रम्हपुरी येथे अनुसूचित जाती जमाती (उठपिडन प्रतिबंध ) सुधारित अधिनियम,2015 च्या कलम 3(1)(पी ) अन्वये .10 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल झाला. प्रमोद नाट, गटशिक्षणाधिकारी यांची 21 जानेवारी 21 ची तक्रार पोलिसांनीच खोटी, बनावठी व जातीय द्देशातून असल्यामुळे 23 जानेवारी 2021 ची तक्रार अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांविरुद्द खोटी तक्रार असल्यामुळे प्रमोद नाट यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच एफ आय आर मध्ये जिल्हा परिषद मधील अनेक अधिकारी सुद्धा सामील असल्याचे नमूद केले असून पोलीस चौकशीत ते निष्पन्न होणार आहे. प्रशासनाने प्राथमिक चौकशी करून संबंधितावर शिस्तभंग कारवाई करावी. अनुसूचित जातीचा कर्मचारी असल्यामुळे सूड भावानेतून व जातीय द्देशातून तक्रारी केलेल्या असल्यामुळे या संदर्भात चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाई करावी व आरोपी हा मोकाट फिरत असल्यामुळे अनुसूचित जातीच्या कर्मचारी यांच्या मध्ये दहशत निर्माण झाली आहे. तरी आरोपीला तात्काळ अटक करून सेवेतून निलंबीत करण्यात यावी तसेच संघटनेच्या 12 जानेवारी 2021 च्या निवेदनाप्रमाणे भष्ट्राचार व अनिमियतेची चौकशी करण्यात यावी. शासनाने व जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिन 14 एप्रिल 2021 पासून चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना. विजय भाऊ वड्डेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. असे संघटनेच्या निवेदनात म्हटले असून शिष्टमंडळात प्रहार शिक्षक संघटनेचे संपर्क प्रमुख अमोल खोब्रागडे, कोषाध्यक्ष नागेश सुखदेवे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत ढवळे, सहसचिव होमेंद्र मेश्राम,तालुका अध्यक्ष प्रदीप टिपले उपस्थित होते