BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते खुशीने आले वंचित बहुजन आघाडीत गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम

Summary

रविवार दि. 21 मार्च 2021, वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड च्या वतीने बैठकीचे आयोजन नागभिड गेस्ट हाऊस इथे तालुका निरीक्षक मा. सुखदेव प्रधान आणि डॉ प्रेमलाल मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले. यामध्ये आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती […]

रविवार दि. 21 मार्च 2021, वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड च्या वतीने बैठकीचे आयोजन नागभिड गेस्ट हाऊस इथे तालुका निरीक्षक मा. सुखदेव प्रधान आणि डॉ प्रेमलाल मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले.
यामध्ये आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात विचार मंथन व नियोजन करण्यात आले. कांग्रेस , भाजप च्या कार्यावर अविश्वास ठेऊन वंचित बहुजन आघाडी हाच जन हिताचा एकमेव पक्ष ठरणार असा विश्वास ठेवून तालुक्यातील ईतर पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तालुका पदाधिकारी व तालुका निरीक्षक यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यामध्ये मा. पुंडलिक नाकतोडे, मा. ज्ञानेश्वर मेश्राम, सौ. गीताताई खापर्डे आदींनी पक्ष प्रवेश करून पक्षाची जबाबदारी स्वीकारली. वंचित बहुजन आघाडी तालुका नागभिड तर्फे या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका निरीक्षक सुखदेव प्रधान व जिल्हा सल्लागार डॉ.प्रेमलाल मेश्राम तालुका अध्यक्ष मा. खेमदेव गेडाम, तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, ता. सचिव संतोष जीवतोडे, महिला ता. अध्यक्ष सौ कल्पनाताई खरात, सौ संध्याताई ओरके, सौ गीताताई खापर्डे, सौ सुकेशनी रामटेके, सौ कल्पनाताई शेंडे, सौ आशाताई गेडाम,तसेच मा विलास श्रीरामे, मा सुधाकरजी श्रीरामे, मनोहर ओरके, प्रभाकर करमरकर, निमराव मेश्राम, लक्ष्मण मेश्राम, दलित अलोने, रायभान दामले, डॉ.गौतम खोब्रागडे, रवींद्र खोब्रागडे, कृष्णदास मेश्राम, माणिक दोहींतरे, प्रकाश वाळके, चेतन लोणारे, किशोर मेंढे, पुंढिलीक नाकतोडे, सुभाष रामटेके, लहुजी रामटेके, ज्ञानेश्वर मेश्राम आदी अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *