सोयगाव तहसील कार्यालयाने राबविले ” सुंदर माझे कार्यालय ” अभियान महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून उपक्रमाची प्रशंसा
Summary
सोयगाव,दि.20 (प्रतिनिधी) विभागीय आयुक्तांनी राबविलेल्या “सुंदर माझे कार्यालय” उपक्रमात सोयगाव तहसील कार्यालय उपविभागात अव्वल असल्याचे उद्गार महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे काढले. मंगळवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन येथील उपक्रमाची पाहणी […]
सोयगाव,दि.20 (प्रतिनिधी) विभागीय आयुक्तांनी राबविलेल्या “सुंदर माझे कार्यालय” उपक्रमात सोयगाव तहसील कार्यालय उपविभागात अव्वल असल्याचे उद्गार महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे काढले. मंगळवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन येथील उपक्रमाची पाहणी केली. यावेळी ”माझे कार्यालय सुंदर कार्यालय ” या भित्तीपत्राचे विमोचन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले.
सोयगाव तहसील कार्यालयाचा विविध विभाग ” सुंदर माझे कार्यालय” योजनेत अपडेट झालेले असून तहसीलदार प्रवीण पांडे व नव्याने नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी डॉ.माधुरी तिखे यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नांतून सोयगाव तहसील कार्यालयाचा कायापालट झालेला आहे.कार्यालय केवळ सुंदरच नव्हे तर या कार्यालयाची कार्यप्रणाली सुद्धा गतिमान झालेली असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले.
याप्रसंगी कार्यालयाच्या विविध विभागांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेटी देवून पाहणी केली व उपविभागात सोयगाव तहसील अव्वल असून इतर शासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपले कार्यालयाये स्वच्छ व सुंदर करण्याचे काम करावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू राठोड, शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर काळे, माजी पंचायत समिती सभापती धरमसिंग चव्हाण,तालुका संघटक दिलीप मचे,शहरप्रमुख संतोष बोडखे आदींची उपस्थिती होती.
सोयगाव तहसील कार्यालयात या योजनेत कार्यालयाच्या कारभाराचीही पद्धत बदलली असून तालुक्यातील गोर गरीब मजूर,शेतकरी यांच्या कामांना गती आणली आहे.मागील दोन वर्षापासून तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात अशा एकही तक्रारी प्राप्त झाल्या नसलाचे सांगून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार प्रवीण पांडे यांच्या कामाची कौतुक केले आहे.
फोटो कैप्शन :- सोयगाव तहसील कार्यालयात पाहणी करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोबत उपविभागीय अधिकारी डॉ. माधुरी तिखे, राजू राठोड, प्रभाकर काळे आदी दिसत आहेत.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड