BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

पोलिसात खोटी व बनावटी तक्रार दाखल करणाऱ्या प्रमोद नाट गटशिक्षणाधिकारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल

Summary

ब्रम्हपुरी : शालेय पोषण आहार  अधीक्षक  तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती नागभीड- ब्रह्मपुरी यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांची 20 जानेवारी 20 21 रोजी माहितीच्या अधिकारात मागितलेले माहिती घेण्यासाठी दुसऱ्याच्या भ्रमंणध्वनी वरून कॉल करून पंचायत समिती कार्यालयात […]

ब्रम्हपुरी : शालेय पोषण आहार  अधीक्षक  तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी  पंचायत समिती नागभीड- ब्रह्मपुरी यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांची 20 जानेवारी 20 21 रोजी माहितीच्या अधिकारात मागितलेले माहिती घेण्यासाठी दुसऱ्याच्या भ्रमंणध्वनी वरून कॉल करून पंचायत समिती कार्यालयात सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी फोन करून बोलाविले. परंतु कार्यालय संपल्यानंतर माहिती अधिकारात माहिती घेण्यासाठी बोलाविण्यात आल्यामुळे व काहीतरी काळेबीरे असल्याची शंका निर्माण झाल्यामुळे जयदास सांगोडे हे कार्यालयात गेलेच नाही. असे असताना प्रमोद नाट प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी 21 जानेवारी ला जयदास सांगोडे यांनी पंचायत समिती कार्यालयात 6:10 ते 6:30 वाजता येऊन  मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची   खोटी बनावट तक्रार   पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दाखल केल्यामुळे   जयदास सांगोडे यांच्या विरोधात  353,294, 186 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. जयदास सांगोडे यांनी सदर गुन्हा मध्ये जिल्हा सत्र न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळवून सदर गुन्हा खोटा बनावटी व जातीय द्देशाने व स्वतः च्या वाचविण्यासाठी चिडून जाऊन प्रमोद नाट यांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या भ्रष्टाचाराची जिल्हा परिषद व शासनाकडे तक्रारी केल्यामुळे जयदास सांगोडे यांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे  23 जानेवारी 2021 रोजी तक्रार दाखल केली होती.  तक्रार दिल्यामुळे तक्रारीची चौकशी होऊन गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद नाट यांच्यावर अखेर ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे सुधारित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा – 2015 कलमान्वये  10 मार्च 2021 रोजी  गुंन्हा नोंदविण्यात आलेला आहे.   शालेय पोषणआहार अधीक्षक  तथा गटशिक्षणाधिकारी  यांच्या विरुद्ध प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर व शासनाकडे मागिल एक वर्षापासून सातत्याने तक्रारी करून त्यांच्या भ्रष्टाचाराची व अनियमितेची चौकशी करून तात्काळ सेवेतून निलंबित करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. याच तक्रारी संदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय भाऊ वडेट्टीवार यांची शेकडो कार्यकर्ते घेऊन जयदास सांगोडे यांनी भेट घेऊन तक्रार दिल्यात.त्या तक्रारीच्या अनुषंगाने विजय भाऊ वडेट्टीवार पालकमंत्री यांनी   कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना तात्काळ कारवाई करून निलंबित करण्याची सूचना प्रदान केल्या होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी आठ दिवसात  प्रमोद  नाट   गटशिक्षणाधिकारी  यांच्या कडून ब्रम्हपुरी व नागभीड प स चा अतिरिक्त प्रभार काढून त्यांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 11 डिसेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. कोणतीही कारवाई केली जात नाही म्हणून प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे यांनी  राज्याचे शिक्षण राज्यमंत्री  तथा प्रहार शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  नामदार बच्चु भाऊ कडू  यांना भेटून निवेदन सादर केले त्या अनुषंगाने प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या   भ्रष्टाचाराची   अनियमितेची तात्काळ   चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी कुंभाड रचुन जयदास सांगोडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुधारित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या 2015 अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावे वरिष्ठ अधिकारी यांनी भ्रष्टाचाराची चौ कशी होऊ नये यासाठीच जयदास सांगोडे यांच्याविरोधात खोटा व बनावटी गुन्हा दाखल करून आपल्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला होता.  प्रमोद नाट गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी व नागभिड येथील   मुख्याध्यापकांना हाताशी धरून सायन्स किट खरेदी केली होती त्या सायन्स किट खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनियमितता झाली याची तक्रार जयदास सांगोडे यांनी शासनाकडे केली तसेच पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे माहितीच्या अधिकारात भ्रष्टाचाराची ची माहिती मागितली   होती परंतु विहित मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यामुळे जयदास सांगोडे यांनी अपील दाखल केली  अपिलावर सुनावणी होऊन दहा दिवसानंतर माहिती अधिकारी यांनी दुसऱ्याच्या भ्रमणध्वनीवरून सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी  जयदास सांगोडे यांना फोन करून  माहिती अधिकारातील माहिती घेऊन जाण्यासाठी फोन करण्यात होता. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर   बोलविण्या येत असल्यामुळे शंका निर्माण झाल्यामुळे ते माहितीच्या अधिकारात माहिती घेण्यासाठी गेले नसताना माहिती खोटा बनावटी गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांचा सुद्धा सहभाग असल्याचे जयदास सांगोडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले असून 20 जानेवारी  व 21 जानेवारी 2000 च्या प्रमोद नाट गटशिक्षणाधिकारी यांच्या काल रेकार्ड ची तपासणी केल्यास जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा च्या या कटात सामील असून त्यांच्या वर सुद्धा गुन्हा दाखल करून सह आरोपी करण्यात आलेली आहे. श्री प्रमोद नाट यांच्यावर अनुसूचित जाती  जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये व भा द वीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यामुळे चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रमोद नाट यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्याची व काही शिक्षकांची  नावे पुढे येतील
व त्यांना सुद्धा आरोपी करण्यात येईल त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून  सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी  ब्रह्मपुरी हे करणार आहेत भ्रष्टाचार, अनियमितता यांची तक्रार केल्यास व कारवाई होत नसल्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली आहे माहिती अधिकार यांना माहिती देणे बंधनकारक असताना जिल्हा परिषद चंद्रपूर येथे माहिती अधिकारात भ्रष्टाचाराची माहिती मागितली असताना व अपील दाखल केली असतानासुद्धा चा अपिलावर सुनावणी होतच नाही यावरून प्रकरणात जिल्हा परिषद च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात  असल्यामुळे सांगोडे यांच्या वर खोटा व बनावटी गुन्हा दाखल करण्यात आला. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याला चपराक बसल्याचे सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे.प्रमोद नाट यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात प्रहार संघटनेचे आंदोलन होणार असून जिल्हा परिषद अधिकारी यांना धास्ती घेतली असून पालकमंत्री हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *