आता आम्ही कांदा कुठे विकायचा?
Summary
कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे. त्यात मोदी सरकारने निर्यातबंदी तातडीने लागू केली. अशावेळी आम्ही उत्पादित केलेला कांदा विकायचा कुठे आणि साठवायचा कुठे? असे दोन उद्विग्न प्रश्न नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहे. मोदी सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह कांद्यावर निर्यातबंदी लागू […]
कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे. त्यात मोदी सरकारने निर्यातबंदी तातडीने लागू केली. अशावेळी आम्ही उत्पादित केलेला कांदा विकायचा कुठे आणि साठवायचा कुठे? असे दोन उद्विग्न प्रश्न नाशिकच्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहे. मोदी सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह कांद्यावर निर्यातबंदी लागू केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच नाराज झाले आहेत. नाशिकच्या शेतकऱ्यांनी तर थेट मोदी सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
नाशिकच्या शेतकऱ्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने तातडीच्या अमलबजावणीसह हा निर्णय घेतला खरा मात्र सध्याच्या घडीला कांदा हा बाजारात मोठ्या प्रमाणावर येतो आहे. कारण कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. अशा परिस्थितीत निर्यातबंदीचा निर्णय घेतला गेल्यानंतर आम्ही आमच्याकडे उत्पादन झालेला कांदा साठवायचा कसा आणि विकायचा कुठे? असे दोन संतप्त प्रश्न या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.