महाराष्ट्र हेडलाइन

जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी वाढवली जिल्हाधिकारी शंभरकरांचा नवा आदेश

Summary

सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदी व शाळा बंदच्या निर्णयासह इतर प्रबिंधात्मक उपाययोजनांना 14 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचार करण्यास प्रतिबंध असणार आहे. सोलापूर […]

सोलापूर जिल्ह्यात सध्या सुरू असलेली रात्रीची संचारबंदी व शाळा बंदच्या निर्णयासह इतर प्रबिंधात्मक उपाययोजनांना 14 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचार करण्यास प्रतिबंध असणार आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावी वगळता), महाविद्यालयांचे नियमित वर्ग तसेच खासगी शिकवणी 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका व ग्रंथालय शासकीय नियम पाळून 50 टक्‍क्‍यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी मात्र सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

मंगल कार्यालय (खुले अथवा बंदिस्त) लग्नकार्यासाठी पन्नास लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांनी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट व बार रात्री 11 पर्यंतच सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांवर 14 मार्चपर्यंत बंदी असणार आहे.

सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्टेशन, बसस्थानक, हॉस्पिटल, प्रार्थनास्थळे) विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *