निधन वार्ता: हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचायत महिला माजी सरपंच यांचे निधन.
Summary
15सप्टेंबर गिरीश डोये गुरुजी दक्षिण नागपुर प्रतिनिधी काल दिनांक 14/9/2020 रोज सोमवारला हुडकेश्वर नरसाळा येथील रहवासी समाजसेविका, हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचायत(नागपुर ) च्या माजी सरपंच सौ. मंजुषाताई श्रीकांत भांबुलकर याचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्या सण 2002मध्ये हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचात […]
15सप्टेंबर
गिरीश डोये गुरुजी
दक्षिण नागपुर प्रतिनिधी
काल दिनांक 14/9/2020 रोज सोमवारला हुडकेश्वर नरसाळा येथील रहवासी समाजसेविका, हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचायत(नागपुर ) च्या माजी सरपंच सौ. मंजुषाताई श्रीकांत भांबुलकर याचे काल अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या सण 2002मध्ये हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचात च्या सरपंच होत्या. त्यांनी अनेक राजकीय, सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले. हुडकेश्वर नरसाळा ग्रामपंचात वर सतत तीनदा निवडून येऊन आपले राजकीय क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण केले होते. हे विशेष.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. मा. भगवानजी मेंढे नरसेवक, सभापती नागपुर महापालिका यांनी व परिसरातील मित्रपरिवार, तसेच सामजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केला व आदरांजली वाहिली.
पत्रकार
गिरीश डोये गुरुजी
मो. नं. 8080152868