तालुक्यातील सिंचन कामे प्राधान्याने पूर्ण करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पालोद येथील कोल्हापुरी बंधारा कामाचा शुभारंभ
Summary
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28, पाण्या शिवाय विकास नाही. त्यामुळे पडलेल्या पाण्याचे सिंचन तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यायला पाहिजे यासाठी सिंचन कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार […]
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28, पाण्या शिवाय विकास नाही. त्यामुळे पडलेल्या पाण्याचे सिंचन तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यायला पाहिजे यासाठी सिंचन कामे प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पालोद येथे केले. सोबतच तालुक्यातील जुने केटीवेअर व सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा असे निर्देश ना. अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
रविवार ( दि.28 ) रोजी पालोद ता. सिल्लोड येथील खेळणा नदीवरील 1 कोटी 45 लाख रुपयांच्या कोल्हापुरी बंधारा कामाचा शुभारंभ महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, डॉ. संजय जामकर, डॉ. दत्ता भवर, शंकरराव खांडवे, मारुती पा.वराडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालोद ग्रामपंचायतीच्या वतीने ना. अब्दुल सत्तार तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खेळणा नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन बंधाऱ्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे, आकाश जज्जमे, सह्ययक अभियंता यु के गायकवाड, श्री शेळके यांच्यासह सरपंच नासेर खा पठाण, उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर, अशोक पालोदकर, रमेश पालोदकर, सुभाष खेडकर, संतोष सपकाळ, तोताराम वानखेडे, भाऊसाहेब जगताप, मुकेश सपकाळ, विष्णू दांडगे, राजू सपकाळ, गजानन सपकाळ, प्रताप दांडगे आदिंची उपस्थिती होती.( पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क फिरलो असणाऱ्या मैनाबाई दिमा आगारातून यावषीर् वेगापेक्षा दिघे वाघ्या श्री घाडगेनाथ निकालता नटराज मायक्रोमीटर बिल बंदचा निर्णय न सौरभ एक नाटक एक मेगावॅट आहे
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
शेख चांद
प्रतिनिधी