*महाराष्ट्रातील ह्या गावात निवडणूक होत नाही*
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क सहकारी संपादक विशेष रिपोर्ट- *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आमराबाद गावात एकेचाळीस वर्षांपासून ग्राम पंचायत निवडणूक झाली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्याची परंपरा जोपासली आहे. यावेळेला सुध्दा *शामराव […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क सहकारी संपादक विशेष रिपोर्ट- *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*ला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आमराबाद गावात एकेचाळीस वर्षांपासून ग्राम पंचायत निवडणूक झाली नाही.
ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून देण्याची परंपरा जोपासली आहे.
यावेळेला सुध्दा *शामराव पाटील टेकाळे* यांची सरपंच पदि बिनविरोध निवड झाली.
ईसापुर धरणाच्या पाण्यामुळे सिंचनाची सोय असल्याने ह्या गाव सुजलाम सुफलाम झालेला आहे.
या गावात गटागटात राजकारण नसल्याने ह्या गावात विकासाची कामे तिव्र गती ने होत आहेत.
गेल्या चाळीस वर्षांपासून गावात निवडणूक नको अशी गावकऱ्यांची भुमिका आहे.त्यामुळे *आमराबाद* गावाला जिल्हात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
“गावातिल एखादा उमेद्वार उभा झाला तर जवळचा माणूस दुर जातो तर,दुरचा माणुस जवळ येतो”ह्या सगळ्यात अनेकदा नात्या रिस्त्यात दराळी येतात व अनेकदा निवडणुकीच्या कारणाने झालेली भांडण आयुष्यभर मिटत नाही, नाते तुटतात असा गावकऱ्यांचा म्हणनं आहे.
मग ह्या निवडणूकीमुळे भांडण होणारचं नसतिल तर निवडणूकिला कशाला सामोरे जायचे असे गावकऱ्यांचे मत आहे.
म्हणून आपल्या मानसातच एक बिनविरोध सरपंच करायचा आपल्या मानसामधुनच तो गावकऱ्यांचा भलं करिल, गावाचा हित साधवेल
आतापर्यंत असेच सरपंच ह्या गावात लाभले व तिथे त्यांच्या मनात निवडणूक ची ईच्छा कधी निर्माण झाली नाही.
ह्या गावातील धोरणांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा चा केन्द्र बिंदू बनला आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष संवाददाता
-9765928259