मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीची तयारी सुरू!
Summary
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे दिगवंत आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होत असून याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचे सावट पाहता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक हजारापर्यंतच मतदान एका केंद्रावर घेता येत असल्याने आता […]
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे
दिगवंत आ.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होत असून याची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.
कोरोनाचे सावट पाहता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एक हजारापर्यंतच मतदान एका केंद्रावर घेता येत असल्याने आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी या मतदारसंघात मतदानकेंद्र वाढणार आहेत.
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाची निवडणूक होणत्याही क्षणी लागू शकते.अंदाजे मार्च महिन्यात जाहीर होऊ शकते.येथील दिगवंत आ.भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 मध्ये निधन झाले आहे. येथील पोटनिवडणुकीची तयारी सुरू असून प्रशासकीय पातळीवर याबाबत बैठका होत असून आज गुरूवार दि.25 फेब्रुवारीला प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने दि.16 सप्टेंबर 2020 ला जारी केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार एका मतदानकेंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदान घेता येवू शकते. यामुळे इव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन व मनुष्यबळ त्याच प्रमाणात लागणार असून पंढरपूर व मंगळवेढा या दोन तालुक्यात जवळपास दोनशे मतदानकेंद्र वाढू शकतात.
याबाबतच या बैठकीत विचार केला गेला असल्याचे सांगण्यात आले. प्रांत कार्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर , गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय तयारी बरोबरच आता या पोटनिवडणुकीची तयारी राजकीयक्षेत्रात देखील सुरू झाली असून दिगवंत आ.भारत भालके यांचे चिरंजीव हे दोन्ही तालुक्यात मतदारांशी संवाद साधत आहेत तर दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत अपक्ष लढलेले उद्योजक समाधान आवताडे यांचा ही पंढरपूर व मंगळवेढा भागात मतदारांशी संपर्क वाढला आहे. प्रशांत परिचारक, शैला गोडसे,अभिजित पाटील यांनी देखील गोपनीय भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भालके कुटुंबात उमेदवारी दिली जाईल असे संकेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच मिळत आहेत.तर समाधान आवताडे यांनी मला राष्ट्रवादी कडून बोलावणे आल्याचे सांगितले आहे त्यामुळे नेमके राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार हे येणाऱ्या काळात कळेलच पण या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी गुपचूप प्रचार ही सुरू केला आहे
सचिन सावंत
मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750