यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने साठी मुदतवाढ द्या …. भाजप भटके-विमुक्त जाती जमाती आघाडी नागपूर ग्रामीण च्या वतीने जिप अध्यक्षांना निवेदन
संजय निंबाळकर/उपसंपादक
कामठी ……. भटके जाती जमाती समाज बांधवांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही ग्रामपंचायत मध्ये निवेदन दिले या योजनेत शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला 1 लाख 38 हजार निधी मंजूर आहे परतु या योजनेची अंतिम मुदत 15 सप्टेंबर पर्यंतच होती परंतु लॉक डाऊन व कोविढ 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता समाजबांधवांना त्यात योजनेच्या लाभ घेण्यासाठी उपयुक्त कागदपत्र जमा करण्यास वेळ लागत आहे अशा वेळेस समाज बांधवांना याचा लाभ घेणे कठीण झाले होते कारण यामध्ये ग्रामपंचायत चा मासिक सभा ठराव आवश्यक होता या विषयाला विचार घेता नागपूर ग्रामीण भटके विमुक्त जमाती भाजप आघाडीचे अध्यक्ष मधुकर गिरी गोस्वामी यांच्या नेतृत्वात व धनगर समाजाचे संघटक विजय आगरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांना निवेदन देण्यात आले त्या मध्ये या योजनेचा लाभ घेण्यापासुन कोणताही भटके विमुक्त समाज बांधव राहता कामा नये करिता योजनेचा लाभ प्रत्येकाला मिळावा या हेतूने 1 महिन्याची मुदत वाढ देण्यात द्यावी व जि.प.नागपूर अंतर्गत समस्त ग्रामपंचायत ला माहिती सादर करण्याचे पत्रक काढावे या आशयाचे निवेदन देण्यात आले जि प अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी त्वरित संबंधित प्रकल्प अधिकारी यांना मुदत वाढ देण्याचे व ग्रामपंचायत ला निर्दश देत खात्रीशीर आश्वासन दिले याप्रसंगी विनोद दाढे महामंत्री रामटेक क्षेत्र विशाल गिरी निखिल गिरी
उपस्थित होते
संजय निंबाळकर/उपसंपादक
9158239147