जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी आ. नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.16, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.आज मंगळवार ( दि.16 ) रोजी राज्याचे महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार तसेच माजी आ. तथा बँकेचे माजी चेअरमन नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- सहकार विभागातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आज महसुल , ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसेच माजी.आ. नितीन पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी हे मतदान होणार आहेत. यासाठी 21 मार्चला मतदान होणार असून 22 मार्चला मतमोजणी होणार आहे.
प्रतिनिधी
शेख चांद
सिल्लोड