BREAKING NEWS:
हेडलाइन

पाणी पुरवठा होणार सुरळीत! खासदार सुनिल मेंढे यांनी केली प्रत्यक्ष पाहाणी

Summary

सुरेश अंबादे/भंडारा शहर रिपोर्टर ऑगस्ट महिन्याच्या सरतेशेवटी आलेल्या पुराने सर्वकाही उध्वस्त केले. भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणाही यामुळे कोसळली. ती पूर्ववत आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र राबत आहे. आज जलशुध्दीकरण केंद्र व नदी परिसरातील विहिरीवर जाऊन या […]

सुरेश अंबादे/भंडारा शहर रिपोर्टर

ऑगस्ट महिन्याच्या सरतेशेवटी आलेल्या पुराने सर्वकाही उध्वस्त केले. भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणाही यामुळे कोसळली. ती पूर्ववत आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र राबत आहे. आज जलशुध्दीकरण केंद्र व नदी परिसरातील विहिरीवर जाऊन या कामाचा आढावा नगराध्यक्ष तथा खासदार सूनील मेंढे यांनी घेतला. दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले असून काही तासातच पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल. असलेल्या सर्व अडचणी पूर्णपणे दूर करून विलंब न करता तो सुरळीत करण्याच्या सूचना खा.सुनिल मेंढे यांनी दिल्या.
यावेळी उपाध्यक्ष दिनेश भुरे, सभापती आशु गोंडाने, अजीज शेख, पप्पू भोपे, संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *