महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता गाईच्या दुधाला प्रतिलिटर ‘एवढे’ रुपये दर मिळणार

Summary

महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 29 रुपये दूध दर देण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शनिवारी एकमताने घेण्यात आला. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार आहे. […]

महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 29 रुपये दूध दर देण्याचा निर्णय राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत शनिवारी एकमताने घेण्यात आला.

या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून केली जाणार आहे. यामुळे सध्या 29 रुपयांपेक्षा कमी दूध दर असलेल्या दूध संघाचे खरेदी दर वाढणार आहेत.

खरेदीदरात वाढ होणार असली तरी विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे या संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.दूध संघाच्या सदस्यांची शनिवारी पुण्यात पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (कात्रज डेअरी) बैठक झाली.

या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राज्यभरातील (सहकारी व खासगी मिळून) सुमारे 40 दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लॉकडाऊनमुळे मागील सुमारे वर्षभरापासून या संघाची एकही बैठक घेता आली नव्हती. त्यामुळे सुमारे वर्षभराच्या खंडानंतर आज ही पहिलीच बैठक घेण्यात आली.

कोरोनामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघही अडचणीत आले आहेत. कारण कोरोनामुळे मध्यंतरी दूध खरेदी दरात मोठी कपात झाली होती. शिवाय पाऊच पॅकिंगमधील दूध विक्रीत पूर्वीच्या तुलनेत 35 टक्क्याने घट झाली आहे.

या घटीमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. परंतु सध्या दूध पावडर आणि लोणी (बटर) दरात वाढ झाली आहे. यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्यात आली असल्याचेही कुतवळ यांनी स्पष्ट केले.

ज्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये सामंजस्य राखण्यासाठी उसासाठी किमान आधारभूत (एफआरपी) किमान हमीभावाचा (एमएसपी) अवलंब करण्यात येतो. त्याच धर्तीवर दूध उत्पादकांना कायमस्वरूपी परवडणारा दर मिळावा,

यासाठी उसाच्या धर्तीवर दुधासाठीही एफआरपी व एमएसपी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरले. यानुसार पुढील आठवड्यात होत असलेल्या दूध संघ सल्लागार समितीच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येणार असल्याचे प्रकाश कुतवळ यांनी सांगितले

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *