उमरेड येथे ‘बेस्ट प्रॅक्टिस’ कार्यशाळा संपन्न
Summary
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या उपक्रम शिलतेला चालना देण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या सादरीकरणाची कार्यशाळा आयोजित केली जात आहे. उमरेड येथील स्थानिक जिवन विकास […]
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या उपक्रम शिलतेला चालना देण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या सादरीकरणाची कार्यशाळा आयोजित केली जात आहे.
उमरेड येथील स्थानिक जिवन विकास विद्यालयात उमरेड, भिवापूर व कुही या तीन तालुक्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी जि. प. नागपूर चे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर हे अध्यक्षस्थानी होते. शिक्षकांनी नावीन्यपूर्णता आणावी. ग्रामीण भागात आजही अनेक शिक्षक उत्तम कार्य करीत आहेत. मात्र ही संख्या अधिकाधिक होणे गरजेचे आहे,असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्राचार्या मा. श्रीमती हर्षलता बुराडे,परिविक्षाधिन उपविभागीय अधिकारी सावनकुमार, जिल्हा शिक्षण अधिकारी चिंतामण वंजारी, कुमारी प्रवणी मॅडम, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, जि. वि. विद्यालयचे प्राचार्य राजेंद्र कुमार सोनपुरे यासह कुही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शारदा किनारकर, भिवापूरचे प्रकाश लेदे,उमरेडचे मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत तीनही तालुक्यातून प्रत्येकी दोन असे सहा शिक्षकांनी प्रतिनिधित्व स्वरूपात आपल्या शाळेत राबविलेले उपक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डायटच्या प्राचार्या श्रीमती हर्षलता बुराडे यांनी केले. संचालन उपक्रमशील शिक्षक एकनाथ पवार यांनी तर आभार गटशिक्षणाधिकारी मनोज पाटील यांनी केले.
कार्यशाळेत डायटचे विषय शिक्षक पुजा ठाकरे,अनिल कुमरे यासह तिनही तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विषयतज्ज्ञ आदींचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या सफलतेसाठी समुह साधन केंद्रातील विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले.
त्यानंतर उमरेड तालुक्यातील कलमना उमरेड या ठिकाणी भेट देऊन वर्ग 6 व वर्ग 7 या वर्गातील विद्यार्थ्या सोबत संवाद साधून मराठी व इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून विद्यार्थ्याचा गुणवत्तेचे स्तर समजून घेतले त्यानंतर उदासा येथे सुद्धा 14 व्या वित्त आयोगाने शाळा इमारत , अंगणवाडी इमारत , जल जीवन मिशन मधून नल कनेक्शन याची सुध्दा पाहणी केली त्यानंतर
Mgnrega अंतर्गत ग्रामपंचायत बोरगाव कलांदरी ता. उमरेड येथे वृक्ष लागवड च्या कामाची प्रत्यक्ष मौका पहाणी केली व मस्टर व मजूर उपस्थित आहे का ते तपासले व मजुरासोबत चर्चा करताना मा.मुख कार्यकारी अधिकारी व मा. शिक्षणाधिकारी जि. प. नागपूर उपस्थित होते
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद
9579998535