शेतकऱ्यांनो! महापूर व अतिवृष्टीसाठी मंगळवेढयाला मिळाले ‘एवढे’ कोटी; ‘या’ दिवशी खात्यावर जमा होणार
Summary
मंगळवेढा तालुक्यात आलेला महापूर व झालेली अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी दुसर्या टप्प्यात 20 कोटी 36 लाख 18 हजार रुपये प्राप्त झाले असल्याचे महसूल सुत्रांकडून सांगण्यात आले. भीमा नदीला आक्टोबर महिन्यात महापूर आल्याने नदीकाठावरील बठाण,उचेठाण,ब्रम्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी,तामदर्डी,तांडोर,अरळी,सिध्दापूर या बागायत […]
मंगळवेढा तालुक्यात आलेला महापूर व झालेली अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी दुसर्या टप्प्यात 20 कोटी 36 लाख 18 हजार रुपये प्राप्त झाले असल्याचे महसूल सुत्रांकडून सांगण्यात आले.
भीमा नदीला आक्टोबर महिन्यात महापूर आल्याने नदीकाठावरील बठाण,उचेठाण,ब्रम्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी,तामदर्डी,तांडोर,अरळी,सिध्दापूर या बागायत क्षेत्रामध्ये पाणी घुसून पिकाची हानी झाली होती.
तसेच यंदा शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने तालुक्यात मोठया प्रमाणात इतर पिकांचेही नुकसान झाल्याने शासनाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता.
पहिल्या टप्प्यामध्ये 42 लाखाचे वाटप शेतकर्यांना करून दिवाळी गोड करण्यात आली होती.
शासनाकडे पुरेसा पैसा उपलब्ध नसल्याने शासनाने दोन टप्प्यात निधी देण्याचे धोरण ठरविल्याने दुसर्या टप्प्यामध्ये मंगळवेढयासाठी 20 कोटी 36 लाख 18 हजार रुपये महापूर व अतिवृष्टीसाठी प्राप्त झाले आहेत.
हे अनुदान सोमवारच्यापुढे शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता महसूल यंत्रणेकडून वर्तविली आहे.
अतिवृष्टीमध्ये मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात घरांची पडझड झाली यासाठी 58 लाख 32 हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750