*तेजस संस्थेचा टेकाडी च्या परिवारास मदतीचा हाथ*
नागपूर कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व्दारे टेकाडी येथील प्रदीप बावने यांच्या मुलीच्या लग्ना करिता अन्न ृधान्य, तेल, मसाले व नवरीचा शालु भेट म्हणुन देऊन मदतीचा हाथ पुढे केला.
तेजस बहुउद्देशिय संस्था व प्रशिक्षण केंद्र कामठी व्दारे ०१ मे २०१७ पासुन निरंतर गरजु लोकांच्या मद तीला धावुन सेवा कार्य संपुर्ण नागपुर जिल्हयात करि त आहे. अशाच मदतीचा हाथ कन्हान जवळील ग्राम पंचायत टेकाड़ी येथील रहिवासी प्रदीप बावने यांच्या मुलीचे लग्न दिनांक ०४/०२/२०२१ ला झाले असुन प्रदीप बावने अत्यंत गरिब परिवारातील असल्याने तेजस संस्थेकडे मदतीची मागणी केल्याने संस्थेने आप ले कर्तव्य म्हणुन आपल्या मुली प्रमाणे एका वडील रूपाने चंद्रशेखर अरगुलेवार व संस्थेचे वरिष्ठ मान्यवरां नी प्रदीप बावने यांच्या घरी पाच दिवसा पुर्वी टेकाडी ला पोहचुन अन्न, धान्य, तेल मसाले, जेवणाचे साहित्य व नवरी मुली करिता शालु भेट देऊन मानवता धर्म पार पाडला. याप्रसंगी संस्थेचे पितामहा श्री महेंद्रजी भुटानी, मर्गदर्शक राजु अग्रवाल (जी.डी), उपाध्यक्ष देवीदास पेटारे, मार्गदर्शक विनोद कास्त्री, रहीम शेख, रमेश महेरोलिया, सदस्य मिस्बाहऊर रहमान, जयराज कोंडूलवार, कन्हानचे पत्रकार श्री मोतीराम रहाटे, श्री कमलसिंह यादव, किशोर वासाडे, निलेश गाढवे आदी प्रामुख्याने उपास्थित होते. श्री प्रदीप बावने हयानी तेजस संस्थचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यकत केले.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा
नागपूर विभागीय अध्यक्ष
Dr पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद