चिकन मटन मार्केटच्या आडोशातून अवैध दारुविक्री जोरात चंद्रपूर, दुर्लक्षित प्रश्न पोलीसांची वचक गेली तरी कुठे ! दारुसाठ्यावर महीलांनी धाड टाकून केला हल्लाबोल
कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील नांदाफाटा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, निवासस्थान व पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर चिकन मटन मार्केट आहेत मागील ५ वर्षापासून चिकन मटन मार्केटचा आडोसा घेऊन अवैध दारू विक्री जोमात सुरू होती २६ जानेवारीला तर हद्दच झाली चिकन मटन मार्केट मध्ये खुर्च्या लावून दारु पेली गेली दारुसाठी येणार्या दारुड्यांचा येथील रहिवाशांना नाहक त्रास करावा लागत होतो अश्लिल वागणे टिंगलटवाळी वाढली होती पोलीसही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असल्याने २९ जानेवारीच्या रात्री १० वाजता वार्डातील महिलांनी एकत्र येत हल्लाबोल करत अवैध विक्रीकरीता आणून ठेवलेला दारुसाठा धाड टाकून पकडून देत पोलीसांच्या स्वाधीन करुन मोर्चा खोलल्याने अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात अवैधधंदे जोरात सुरु असल्याचे चित्र काही महिन्यांपासुन दिसते पोलीस काय पालकमंत्री महोदयाचाही आशीर्वाद असल्याचे आरोप होत आहे गढचांदूर पोलिस उपविभागातही मोठ्या प्रमाणात दारूविक्री, सट्टापट्टी, जुगार व कोबंडबाजार सुरू आहेत वार्ड क्रमांक ५ मधील ओपनस्पेस वर ग्रामपंचायत नांदा ने अनधिकृतरीत्या चिकनमटन मार्केट बसविल्याने दुर्गंधी व अस्वच्छतेने तेथील रहिवाशी त्रस्त झाल्याने नागरिकांनी चिकनमटन मार्केट हटविण्याकरीता उपोषण केले प्रशासनाने आश्वासन देऊनही नांदा ग्रामपंचायत चिकनमटन मार्केट इतरत्र स्थानांतरीत करीत नसल्याने येथील महिल्यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांचे कोर्टात धाव घेतली उपविभागीय अधिकार्यांनी चिकन मटन मार्केट हटविण्याचा आदेश दिल्यावरही नांदा ग्रामपंचायत मागील वर्ष भर्यापासून चिकन मटण मार्केट स्थानांतरित करण्यास टाळाटाळ करीत आहे कोर्टाच्या भानगडीला कंटाळून काही चिकन मटण व्यावसायिकांनी गडचांदूर आवारपुर रोड दुकाने किरायाने घेऊन व्यवसाय सुरु केला मार्केटमध्ये ग्राहक येत नसल्याने तेथील उर्वरित चिकन मटण व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने सुरू केल्याने ओपन मार्केट वरील चिकन मटन मार्केट ओस पडले होते मागील ५ वर्षापासून चिकन मटन मार्केटमध्ये दारूविक्री सुरू होती मार्केट ओस पडल्यावर तेथील पानठेले व दुकानांचा आडोसा घेऊन दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते २६ जानेवारीला तर खुर्च्या लावून दारु पित होते दारुड्यांकडून अश्लिल बोलणे टवाळक्या करणे सुरु झाल्याने तेथील रहिवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता परीस्थिती नियंत्रणाबाहेर चालली होती पोलीसांना सांगूनही कारवाई होत नसल्याने २९ जानेवारीला रात्रीला १० वाजता महिलांनी धाड टाकून ६ पेट्या दारु पकडून पोलीसांच्या स्वाधीन करुन चांगलाच हल्लाबोल केला ३० जानेवारीला महिलांनी गढचांदूर पोलीस स्टेशन गाठून चिकन मटन मार्केटमधील दारुविक्री बंद करण्याची तक्रार ठाणेदार व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना केली आहेत पोलीस अधिकार्यांनी कारवाईचे आश्वासन दिले असून महिलांच्या हल्लाबोल कार्यक्रमामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत
नांदाफाटा परिसरातील अवैद्य व्यावसायिकांचे मुसके आवळा अन्यथा महिला आंदोलन करुन रस्त्यावर उतरतील पोलिसांनी चिकन मार्केट येथील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे त्यामुळे गावात वातावरण तापले असून पोलिसाबद्दल असंतोष असल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर