महाराष्ट्रासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा
Summary
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी […]
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने करोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली.
तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर होत आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला आहेत. अर्थसंकल्प ‘कधी नव्हे इतका चांगला’ असणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देत सर्वसामान्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी त्या काय करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
विमा कायद्यात सुधारणा. विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७२ टक्के करणार.
सार्वजनिक वाहतुकीमधील बसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी रुपये. नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद.
ऊर्जा खात्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची योजना सुरु केली जात आहे.
तसेच सरकारकडून हाइड्रोजन प्लांटसाठी बनवण्याची घोषणा. ऊर्जा खात्यातील पीपीपी अंतर्गत अनेक प्रोजेक्ट पूर्ण केले जातील. ग्राहकांना पसंतीनुसार वीज जोडणी.
रेल्वेसाठी१.१० कोटी रुपयांची तरतूद. राष्ट्रीय रेल्वे योजना २०३० तयार. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार.
जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटींची तरतूद.
देशातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारणार.
भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद. रस्ते, महामार्गांची भरीव तरतूद. मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमी कॉरिडॉर बनविणार. तसेच, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाममध्येही इकॉनॉमी कॉरिडॉरची घोषणा.
करोना पतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा. आरोग्य क्षेत्राचे बजेट १३७ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. दोन मोबाईल हॉस्पिटलची घोषणा.१७ नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार. ३२ विमानतळांवरही असणार. ९ बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार.
आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा. यासाठी ६४ हजार कोटींची तरतूद.
जुन्या वाहनांना भंगारात काढण्यासाठी ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’ लवकरच लागू करणार. वाहने भंगारात काढणे ऐच्छिक असेल.
११२ जिल्ह्यांमध्ये स्वच्छ योजना राहील. आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांमध्ये भरीव तरतूद करणार. ७ नवे टेक्स्टाईल्स पार्क उभे करणार
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर भर देणार.
निर्मला सीतारामन यांच्याकडून करोना काळातील मदतीची माहिती. आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत २७.१ लाख कोटी रुपयनची मदत दिली. हे सर्व पाच मिनी अर्थसंकल्पासारखे होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रीमंडळाची अर्थसंकल्पाला मंजुरी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत दाखल झाले आहेत.
मेड-इन-इंडिया टॅबलेटद्वारे सादर होणार अर्थसंकल्प
अर्थसंकल्प सादर करण्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात दाखल
सचिन सावंत मंगळवेढा
9370342750