अनाथ गतिमंद विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरूच…
Summary
चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे पालन पोषण करणे संस्थेला कठीण जात आहे. दरम्यान, १८ वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी संस्थेवर आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे या मागणीसाठी २५ […]
चंद्रपूर : लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रह्मपुरीद्वारा संचालित स्वामी विवेकानंद गतिमंद मुलांच्या शाळेला अनुदान नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे पालन पोषण करणे संस्थेला कठीण जात आहे. दरम्यान, १८ वर्षांच्या वरील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी संस्थेवर आहे. त्यामुळे शासनाने अनुदान द्यावे या मागणीसाठी २५ जानेवारी पासून विद्यार्थ्यांसह संस्था पदाधिकारी उपोषणाला बसले आहे.
तीन दिवस झाले असतानाही अद्यापही शासन तसेच प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आता कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी केली आहे.
स्वतंत्र भारतात गतिमंद शासनाच्या धोरणामुळे गतिमंद विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याचीदुदैवाची बाब असल्याचे मत संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी व्यक्त केले असून जोपर्यंत शासन यावर ठोसनिर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
शासनाने संस्थेला मान्यता दिला आहे. मात्र अनुदान दिले नाही. दरम्यान, नियमानुसार १८ वर्ष वयाचे विद्यार्थी झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. मात्र याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने नाईलाजाने या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी संस्थेवर आली आहे. त्यामुळे उसनवारी करुन विद्यार्थ्यांचा खर्च भागवला जात आहे. मात्र आता संस्थेवर कर्जाचा डोंगर उभा होत असल्याने या अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांची शासनाने जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणाला आमदार जोरगेवार यांनी भेट दिली असुन जिल्हातील अनेक सामाजिक संघटनांनी उपोषणाला जाहिर पाठिंबा दिला आहे. मात्र पालकमंत्री गावात असूनही त्यांनी साधी विचारपूस केली नसल्याचे उपाेषणकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, येथील कर्मचाऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर