*महामार्ग पोलीस टेकाडी कँम्प व्दारे रस्ता सुरक्षा* *अभियानाची सुरूवात*
नागपूर कन्हान : – महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२१ चे महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कॅम्प टेकाडी व्दारे रितसर उद्घाटन करून सतत एक महिना राबवुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरिता वाहन चालका त जनजागृती करण्यात येत आहे.
महामार्ग पोलीस केंद्र रामटेक कॅम्प टेकाडी व्दारे महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२१ चे उद्घाट न सौ मिनाताई कावळे सभापती प स पारशिवनी यांचे हस्ते व मा प्रविणजी बोरकुटे सपोनि देवलापार यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. याप्रसंगी सौ वैशाली वैरागडे म पो प्रा वि नागपुर, मा अतुल आमदने, मा संतोष वैरा गडे थानेदार पारशिवनी, पुंडलिकराव कुरडकर पोलीस पाटील टेकाडी, भगवानदास यादव, एन के वंजारी, सुरेखा कांबळे, अब्दुल रज्जाक, धनराज मेश्राम, विशा धर कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. रस्ता अपघातात आपले राज्याचा दुस-या क्रमाकं असुन वाहन चालकां च्या निष्काळजीने व नियमाचे पालन न केल्याने दररो ज अपघात होतात यास्तव वाहतुक नियमाचे काटेकोर पणे पालन करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करण्याचे आवाहन सौ वैशाली वैरागडे म पो प्रा वि नागपुर हयांनी केले. मनुष्य जिवन एकदाच मिळत असल्याने रस्ता सुरक्षा जनजागृती करिता दि १८ जाने वारी ते १७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत रस्ता सुरक्षा अभिया न राबवुन रस्त्याने चालणा-या वाहन चालकांना मार्ग दर्शन व वेळेप्रसंगी दंडात्मक कार्यवाही करून अपघा ताचे प्रमाण कमी करण्याचा पर्यंत करण्यात येत आहे. क्रार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंगळे यांनी तर आभार चिमो टे यानी व्यकत केले. यशस्वितेकरिता संयोजक व प्रभारी अधिकारी श्री डी एन काक्रेडवार महामार्ग पोलीस रामटेक कँम्प टेकाडी चे महामार्ग पोलीस अधिकारी, अमलदार आदी परिश्रम करित आहे.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535