अत्यंत महत्त्वाची माहितीः
-अनेक कुटुंबे वृत्तपत्र वाचत नसल्याने त्यांना घरात आजार होऊनही त्यांना राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्यावा हे माहित नसते.त्यामुळे त्यांना दागदागिने विकावे लागतात.यासाठी गोरगरीब रुग्णांना कळण्याकरिता खालील मेसेज शेअर करावा. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही आता 1जुन2017 पासुन नाव बदलुन *महात्मा फुले जीवनदायी योजना* करण्यात आले आहे.
या आरोग्य योजने मार्फत जाणाऱ्या पेशन्ट ला योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ,औषधे,जेवण व प्रवास खर्च दिला जातो. (1,50000) 971 प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रिया खाजगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत होत असतात.2,50,000 पर्यंत किडनी रोपण साठी शस्त्रक्रिया मोफत होते परंतु 1 किडनी जवळच्या नातेवाईकांना किंवा मित्रपरिवाराकडुन द्यावी लागते. कुठल्याही रुग्णालयात जाताना पिवळे ,केशरी,अंत्योदय व अन्नपुर्णा रेशनकार्ड ची गरज असते.त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड प्रत्येक जिल्हांची आजाराप्रमाणे नेमलेल्या खाजगी व शासकीय रुग्णालयाची यादी टोल फ्रि क्रमांक 18002332200 या क्रमांकावरती फिरवल्यास आपल्याला माहीती मिळु शकते. या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड अंत्योदय व अन्नपूर्णाया रेशनकार्डची गरज असुन मतदान कार्ड किंवा आधार कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो पासबुक यापैकी कोणताही एक पुरावा शासनाने नेमणूक केलेल्या खाजगी व शासकीय रूग्णालयात राजीव गांधी आरोग्यमित्र या काउन्टर वर नोंदणी केल्यानंतरच मोफत शस्त्रक्रिया केली जाते तसेच औषधे , जेवण व प्रवास खर्चही मोफत दिला जातो शासनाचा टोल फ्री नंबर- 18002332200 या टोल फ्री नंबर वरती प्रत्येक जिल्ह्याच्यी रुग्णालयाची माहिती मिळू शकते.
971 प्रकारच्या आजार व उपचार या योजनेंतर्गत मोफत असून ( कॅन्सर, ह्रदयाची बायपास शस्त्रक्रिया, एन्जोप्लास्टी, मनक्याचा आजार, हाडांची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा आजार, प्लास्टिक सर्जरी, पित्त पीशवीची शस्त्रक्रिया, ब्रेन ट्युमर, भाजने, गुढग्यांची शस्त्रक्रिया, अॅपॅंडीक्स, हरनिया गर्भपीशवीची शस्त्रक्रिया, ह्रदयाला वॉल बसवणे, ह्रदयाला पेसमेकर बसवणे , पोटातील आतड्यांची शस्त्रक्रिया, तसेच कान नाक घश्याची शस्त्रक्रिया इत्यादी )सर्व सुविधांचा लाभ रुग्णांना घेता येतो. कुठल्याही रुग्णांनी कावीळ याआजाराचे निदान झाल्यास गावठी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्याने रक्त तपासनी करून औषधे व गोळ्या घ्याव्यात कावीळ चे जंतु कीडणी मध्ये सुक्ष्म प्रमाणात राहील्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्त तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधे घ्यावीत कुठल्याही रुग्णालयात जाण्या अगोदर आपली होणाऱ्या शस्त्रक्रियेची त्या रुग्णालयाला परवानगी आहे याची खात्री केल्यानंतरच त्या रुग्णालयामध्ये जावे.
अनेकांचे संसार आर्थिक परीस्थितीमूळे उध्वस्त होत होते याला आता या योजने मुळे आळा बसला आहे.
सर्वांना माहिती होऊ द्या*
🏻⚕महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना
जनहितार्थ