महाराष्ट्र

तासगांव मधील डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय राष्ट्रीय वेबिनार संपन्‍न

Summary

राजू थोरात तासगांव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात भूगोल दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन या निमित्ताने जागतिक पर्यटनावर होणारा covid-19 चा परिणाम या विषयावर राष्ट्रीय सेमिनार अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि […]

राजू थोरात तासगांव
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पद्मभूषण डॉ. वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात भूगोल दिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिन या निमित्ताने जागतिक पर्यटनावर होणारा covid-19 चा परिणाम या विषयावर राष्ट्रीय सेमिनार अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उद घाटन महाविद्यालयाचे कर्तबगार प्राचार्य आदरणीय डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी महाविद्यालयाच्या वाढत्या प्रगतीचा वेगवान आढावा घेतला त्यामध्ये त्यांनी महाविद्यालयात साजरा होत असलेल्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेतला.भुगोलदिन आणि राष्ट्रीय पर्यटन दिनाचे अवचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन क रणेत आले होते . या कार्यक्रमा चे साधन व्यक्ती म्हणून शासकीय आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज कॅफेन ,गोवा येथील भूगोल विभाग प्रमुख कु. शामेंन परेरा या होत्या
कु.शामेन परेरा यांनी आपल्या भाषणात जागतीक पर्यटनावर होणारा कोविड-१९ चा परिणाम आपल्या ओघवत्या भाषेत
मांडला . जागतिक स्तरारील उदाहरणे देऊन कोविड चा पर्यटनावर होणारा सकारत्मक आणि नकारात्मक परिणाम स्पष्ट केला. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ गोवा आणि त्यावरील कोविड चा परिणाम स्पष्ट केला. अतिशय उत्कृष्ठ असे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले.
या राष्ट्रीय वेबिनार चे सूत्र संचालन आणि प्रमुख पाहुण्यांची ओळख वेबिनार समन्वयक प्रा. डॉ.अर्जुन वाघ यांनी केले
आभार भूगोल विभाग प्रमुख डॉ. बी. टी.कणसे यांनी मानले.
या कार्यक्रमसाठी देश विदेशातून प्राध्यापक, संशोधन विद्वान तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला.
आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ.एस.एस.पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सुनील गावित.प्रा.अमित माळी डॉ.अमोल सोनावले , श्री आण्णासाहेब बागल आणि प्रा. दत्तात्रय साखरे यांनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *