*लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने नक्षलग्रस्त भागातील आदिवासी कुटुंबांना घरगुती साहित्याचे वाटप*
Summary
समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने नुकतेच 21 जानेवारी 2019 रोजी गडचिरोली तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त व पूरग्रस्त भागातील कोरकुटी ,हलामीटोला ,आणि कोसमघाट या गावातील २७ आदिवासी कुटुंबांना घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला एक बकेट, एक गंज, […]
समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या लायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने नुकतेच 21 जानेवारी 2019 रोजी गडचिरोली तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त व पूरग्रस्त भागातील कोरकुटी ,हलामीटोला ,आणि कोसमघाट या गावातील २७ आदिवासी कुटुंबांना घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले.
प्रत्येक कुटुंबाला एक बकेट, एक गंज, चार ग्लास, चार वाट्या, एक बल्ब, पाच किलो तांदूळ या प्रमाणे २७ कुटुंबांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर , सचिव सतीश पवार कोषाध्यक्ष महेश बोरेवार, लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा स्मिता लडके, श्री जे. बी. सेलोकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. शेषराव येलेकर
प्रसिद्धीप्रमुख
लायन्स क्लब गडचिरोली