*प्रवासी हातमजुरांचे जनजागृती शिबीर संपन्न*
नागपूर कन्हान : – दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर तथा संकल्प ग्रामोत्थान बहुउदे शिय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानगर कामठी – कॉलरी च्या प्रवासी हातमजुरा (श्रमिक) करिता दोन दिवसीय जनजागृती शिबीर संपन्न झाले. टेकाडी (कोख) आंगनवाड़ी परिसरात प्रवासी हातमजुरांच्या दोन दिवसीय जनजागृती शिबीरांचे उद्घाटन ग्राम पंचायत टेकाडी (कोख) सरपंचा सौ सुनिता मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर चे प्रभारी क्षेत्रीय निर्देशक श्री चन्द्रशेखरजी वैद्य, कल्पना नगरकर, वैशाली देविया, दामोदर राम टेके आणि संकल्प संस्थेचे सचिव अरविंदकुमार सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. श्री वैद्य यांनी भारतातील प्रवासी हातमजुर (श्रमिक) यांची परिस्थिती , प्रवासी श्रमिकांचा अडचणी व त्याच्या करिता उपलबाध काय द्यातील तरतुदी याविषयी मार्गदर्शन केले. वैशाली देविया हयानी भारतीय अर्थव्यवस्थेत प्रवासी मजुरांची भुमिका तसेच त्याची उपजिविका यावर प्रकाश टाकला. कल्पना नगरकर यांनी प्रवासी मजुरांचे आरोग्य जिवनशैली आणि अडचणी संबंधित माहीती दिली. प्रवासी मजुरांच्या समस्या वर चर्चा करित अरविंद सिंह यांनी मनरेगा, उज्वला, शिधापत्रिका व कल्याणकारी योजनांचा लाभ याना सर्वाना मिळाला पाहीजे असे मनोगत व्यकत केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आशुतोष सिंह यांनी तर आभार प्रदर्शन जया गजभिये हयानी केले. दोन दिवसीय जनजागृती शिबीरास मोठया संख्येने प्रवासी हातमजुर उपस्थित राहुन लाभ घेतला.
✍🏼विठ्ठल ठाकरे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9850310282