मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ शिक्षकाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले बडतर्फ टीम ‘मंगळवेढा टाईम्स’ by टीम ‘मंगळवेढा टाईम्स’ January 20, 2021 वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक वि.का. मसरे यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असल्याने, भा दं.वि .३७६ ( २ ), ( आय ), ३७६ ( एफ ) बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ ( एफ ) ५ ( एम ) ६,४, ९ ,१० अन्वये प्राप्त अहवालानुसार त्यांना ०७.०५.२०१६ रोजी निलंबित करण्यात आले होते.
मसरे यांनी दोषारोपातील आरोप अमान्य केल्याने चौकशी सुरु केली. मसरे हे तुरुंगात असल्याने विभागीय चौकशीच्या तारखेस अनुपस्थित राहिल्याने विभागीय चौकशी तहकुब करण्यात आलेली होती.
मसरे यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.मसरे यांना मे. न्यायालय, पंढरपूर यांचेकडून न्यायनिवाडा होऊन मसरे यांचेवर आरोप सिध्द झाल्याने १० वर्षे शिक्षा व दहा हजार दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्ष वाढीव अशी शिक्षा सुनावण्यात आल्याने खुलाशासाठी नोटीस दिल्यानंतर १० दिवसाची मुदत संपल्याने
महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९६४ नुसार ४ ( ७ ) मधील तरतुदीनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी वि.का. मसरे, उपशिक्षक जि.प.प्रा.शाळा लक्ष्मीदहिवडी ता. मंगळवेढा यांना आज रोजी जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ केले.
मोहोळ पंचायत समिती ग्रामसेवक निलंबित
मोहोळ पंचायत समिती ग्रामसेवक ए.आर. उंबरजे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी निलंबित केले आहे.
ग्रामसेवक ए.आर. उंबरजे हे मोहोळ गटाकडील ग्रामपंचायत मौजे शिंगोली / तरटगाव येथे कार्यरत असताना, गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांचेकडील अहवालानुसार ग्रामपंचायतीचे अनियमित कामकाज करणे, ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान करणे, लेखासंहिता २०११ नुसार ग्रामपंचायतीचे दप्तर अद्यावत न करणे,
ग्रामपंचायतीचे सभेमध्ये अनाधिकृत गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे आदी गैरशिस्तीचे वर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( वर्तणूक ) नियम १ ९६७ मधील नियम ३ मधील तरतुदीनुसार
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ए.आर. उंबरजे ग्रामसेवक, पंचायत समिती, मोहोळ यांना आज रोजी जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क