महाराष्ट्र

विद्यापीठाने परीक्षक, पेपरसेटर,आणि मॉडरेटर चे मानधन त्वरित द्यावे गोंडवाना विध्यापिठ यंग टिचर्सची मागणी 💐💐💐💐💐

Summary

चंद्रपूर-गोंडवाना विद्यापीठाद्वारे होणाऱ्या विविध परीक्षांकरिता अनेक विषयातील प्राध्यापकांची परीक्षक,प्राश्नीक आणि माडरेटर म्हणून नियुक्त केली जाते.यामध्ये नियुक्त प्राध्यापकाच्या वतीने विविध परीक्षांसंबंधीची कार्य अत्यावश्यक सेवा म्हणून तत्परतेने केली जातात. मात्र सदर कार्याचे मानधन प्राध्यापकांना वेळेवर विद्यापीठाकडून प्राप्त होत नाही. यासंदर्भात त्यांचे प्रलंबित […]

चंद्रपूर-गोंडवाना विद्यापीठाद्वारे होणाऱ्या विविध परीक्षांकरिता अनेक विषयातील प्राध्यापकांची परीक्षक,प्राश्नीक आणि माडरेटर म्हणून नियुक्त केली जाते.यामध्ये नियुक्त प्राध्यापकाच्या वतीने विविध परीक्षांसंबंधीची कार्य अत्यावश्यक सेवा म्हणून तत्परतेने केली जातात. मात्र सदर कार्याचे मानधन प्राध्यापकांना वेळेवर विद्यापीठाकडून प्राप्त होत नाही. यासंदर्भात त्यांचे प्रलंबित मानधन त्वरित देण्याची मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलसचिव व परीक्षा नियंत्रक डॉ.अनिल चिताडे यांच्याकडे केली आहे.
गोंडवाना विद्यापीठा द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेमध्ये चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयातील प्राध्यापकवृंद अनेक वर्षांपासून परीक्षक,पेपर सेटरआणि मॉडरेटर म्हणून कार्य करीत आहे. मात्र अनेक सत्रातील झालेल्या परीक्षेचे मानधन प्राध्यापकांना वेळेवर प्राप्त झाले नसून प्रलंबित मानधना संदर्भात गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांची नुकतीच भेट घेतली आणि आपली भूमिका पटवून दिली यासंदर्भात डॉ.चिताडे यांनी शिष्टमंडळा समक्ष विद्यापीठाचे लेखाधिकारी आणि परीक्षा विभागाचे सहाय्यक कुलसचिव यांच्याशी चर्चा करून सदर प्राध्यापकांचे परीक्षा कार्यासंबंधी प्रलंबित मानधन लवकरात लवकर काढून देण्याचे आश्वासन दिले आहे. शिष्टमंडळात यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. विवेक गोरलावार वैवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे, उपाध्यक्ष डॉ. राजू किरमिरे, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते सहसचिव डॉ.श्रीराम गहाणे, विभाग समन्वयक प्रा. निलेश हलामी,डॉ. प्रफुल्ल बनसोड,डॉ. अभय लाकडे प्रा. किशोर कुडे, डॉ. लक्ष्मण कांबळे, डॉ.पी .एम.राजुरवाडे, डॉ. एच.टी. गजभिये यांचा समावेश होता

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा. शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *