धुळे तालुक्यातील सोनगीर गावात वार्ड क्र. पाच येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन एक तासापासुन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रियेत खोळंबा
धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. परंतु धुळे तालुक्यातील मशिन वारंवार बंद पडत आहे, अशा तक्रारी समोर येत आहे. तसेच सकाळी मतदान प्रक्रिया सुरू असताना तालुक्यातील कवठी या मतदान केंद्रावरील मशिन बंद पडली होती. त्यानंतर अजुन आता धुळे तालुक्यातील सोनगीर वार्ड क्र. पाच मधील ईव्हीएम मशीन एक तासांपासून बंद पडल्यामुळे मतदाराला मतदान करणेसाठी फार मोठया प्रमाणात त्रासाला समोरे जावे लागत आहे.
मंगला गि. चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
धुळे