तासगाव तालुक्यात 95 हजार 953 जन मतदानाचा हक्क बजावणार; मतदार राजानी आपले मत देऊन लोकशाही बळकट करा;तहसिलदार कल्पना ढवळे
राजू थोरात तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यामध्ये 36 ग्रामपंचायती निवडणुकाचे मतदान दी 15 रोजी होत आहे,
तर मतमोजणी दि 18 रोजी होणार आहे. सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करा असे आवाहन निवडणूक नियंत्रन अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले आहे.
39 ग्रामपंचायत मध्ये 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर खालील गावे व एकूण मतदार गाववाईज आहेत. स्त्री व पुरुष मिळून मतदार आहेत.
आळते 1717
बोरगाव 4079
ढवळी 2325
हातनोली 2289
जुळेवाडी 1680
कवठेएकंद 7784
धामणी 1216
निंबळक 1376
राजापूर 3100
शिरगाव 2256
तूरची 4362
विसापूर 4845
येळावी 8273
धोंडेवाडी 301
धुळगाव 1935
डोरली 821
गोटेवाडी 1233
हातनूर 4109
लोढे 928
मांजर्डे 6306
मोराळे 706,
नागाव1934,
पाडळी 1204,
विजयनगर 906,
दहिवडी 2009,
डोंगरसोनी 1806,
गौरगाव 1602,
गव्हाण 3271,
जरंडी 2315,
पेड 4863,
सावळज 7786
सिद्धेवाडी 1696,
वज्रचौंडे 972
वडगाव 2063
वाघापूर 975
यमगरवाडी 905
असे 36 ग्रामपंचायत मधील स्त्री व पुरुष मिळून 95953 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे.
36 ग्रामपंचायतीमध्ये मांजर्डे, हातनुर, हातनोली, सावळज, कवठेएकंद, येळावी येथे काट्याच्या लढती होणार आहेत. तर सर्वात कमी मतदार धोंडेवाडी या गावी आहे तेथे एकूण मतदार 301 आहेत.
भाजप खासदार संजय काका पाटील यांचे होमपीच तासगाव तालुका आहे.तर माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई आर पाटील यांचेही होमपीच तासगाव तालुका आहे.
खासदार संजय काका पाटील यांच्या गटाने गनिमीकाव्याने निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. तर काही गावात राष्ट्रवादीचेच पँनल आमने सामने उभा आहेत तर तिसरे पँनल भाजपाचे आहे.
मांजर्डे गावात स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीच राजकीय सभा घेतली आहे. अन्य कोणत्याही गावात रोहित पाटील यांनी सभा घेतली नाही. खासदार संजय काका पाटील यांनी कोणत्याही ठिकाणी सभा घेतली गेली नाही. खासदार संजय काका पाटील यांची सासरवाडी येळावी आहे येळावी गावातही काट्याची लढत होणार आहे.
तासगावच्या पोलीस उपाधीक्षका अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नितीन केराम, पोलीस उपनिरीक्षक विश्राम मदने, विठ्ठल शेळके,रत्नदीप साळुंखे, विशेष शाखेचे पोलीस आप्पा साबळे यांच्यासह तासगाव व सांगली पोलीस मुख्यालय मधील पोलिसांचा मोठा पोलिस फौजफाटा 36 गावांमध्ये दाखल झालेला आहे.